मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९

स्‍वाइन फ्ल्‍यू म्हणजे काय?



मॅक्सिकोमध्‍ये स्‍वाइन फ्ल्‍युची लागण झाल्‍याचे लक्षात आले आणि त्‍यानंतर अमेरिका, ब्रिटनसह जगभरात या रोगाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे. या संदर्भात आरोग्य यंत्रणा सज्ज असल्‍या आणि हा रोग इतरत्र पसरू नये यासाठी प्रयत्‍न केले जात असले तरीही त्‍्याची व्‍याप्‍ती वाढत ते भारतापर्यंत आणि पुण्‍यातही येऊन पोचली आहे. दक्षता म्‍हणून जागतिक आरोग्य संघटनेने महामारी जाहीर केली आहे. शासन पातळीवरून प्रयत्‍न केले जात असले तरीही प्रत्‍यक्ष नागरिकांनीही दक्षता घेण्‍याची आवश्‍यकता आहे.

मुख्‍यतः डुकरांमध्‍ये टाईप ए एनफ्ल्‍युएन्‍जा विषाणुंच्‍या संक्रमणामुळे स्‍वाइन फ्ल्‍यूची लागण होते. या रोगाचा संबंध मुख्‍यतः श्‍वसन प्रक्रियेशी येत असल्‍याने यास श्‍वास रोग असेही काही ठिकाणी म्‍हणतात.

Tamiflu किंवा Relenza यासारखी औषधे घ्‍यावीत. मात्र या रोगापासून बचावासाठी आधीच ही औषधे अजिबात घेऊ नयेत. याशिवाय या आजारापासून बचावासाठी तुळशीच्‍या पानांचा किंवा मंजुळ्यांचा चहा घेतल्‍यास या आजाराची लागण होण्‍याची शक्यता कमी असते.
सामान्‍यतः या रोगाचा विषाणू मनुष्‍यावर प्रभावी ठरत नाही अशी धारणा होती. मात्र गेल्‍या काही वर्षांत समोर आलेल्‍या संशोधनानुसार या रोगाच्‍या विषाणुची लागण आता मनुष्‍यालाही होऊ लागली आहे. या रोगाचा फैलाव मुख्‍यत्वे वराह पालन करणारे आणि त्‍यांचे मांस विक्री किंवा भक्षण करणारे यांच्‍याद्वारे होण्‍याची दाट शक्यता असते.

अतिशय वेगाने पसरणा-या या रोगाची लक्षणे सर्वसामान्‍य फ्ल्‍यू सारखीच असतात. शिंकणे, खोकणे, संक्रमित सार्वजनिक वापराच्‍या वस्‍तूंना हाताळणे किंवा श्‍वासाद्वारेही या रोगाचा वेगाने फैलाव होऊ शकतो. 1976 मध्‍ये सर्वप्रथम या रोगाची ओळख झाली.

या रोगाची लक्षणे

सामान्‍य मानवी फ्ल्‍यू प्रमाणेच याची लक्षणे आहेत. ताप येणे, खोकला येणे, घशाला कोरड पडणे, अंग व डोकेदुखी आणि मळमळून उलट्या होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत.

या रोगापासून बचावाचे उपाय

या रोगाची लागण आणि संसर्ग होऊ नये यासाठी नाक आणि तोंड मास्‍कने झाकून ठेवणे उत्तम. सार्वजनिक स्‍वच्‍छता गृहाच्‍या नळाचा, गाडीच्‍या दरवाज्‍याचा, सायबर कॅफेवरील माऊस किंवा कीबोर्डचा वापर केल्‍यानंतर हात साबणाने वरचेवर स्‍वच्‍छ करावेत. जर आपल्‍यात अशा प्रकारच्‍या रोगाची लक्षणे दिसत असतील. तर त्‍वरित डॉक्टरांचा सल्‍ला घेऊन घरीच थांबलेले बरे.

स्‍वाइन फ्ल्‍यू अतिसंसर्गजन्‍य आहे किंवा नाही हे अद्याप वैज्ञानिक दृष्‍ट्या सिध्‍द झाले नसले तरीही सामान्‍य फ्ल्‍यू प्रमाणे त्याचा फैलाव होत असल्‍याने त्‍याला संसर्गजन्‍य म्‍हटले जात आहे. फ्ल्‍यूचा विषाणू बाहेरील वातावरणातही बराच वेळ तग धरून राहू शकतो.

स्‍वाइन फ्ल्‍यूवर उपाय आहेत का?

होय, अशी लक्षणे दिसल्‍यास Tamiflu किंवा Relenza यासारखी औषधे घ्‍यावीत. मात्र ती घेताना त्‍यांची मुदत संप‍लेली नाही ना याची खात्री करून मगच घ्‍यावीत. मात्र या रोगापासून बचावासाठी आधीच ही औषधे अजिबात घेऊ नयेत. याशिवाय या आजारापासून बचावासाठी आयुर्वेदाने पर्याय सांगितले आहेत. त्‍यानुसार तुळशीच्‍या पानांचा किंवा मंजुळ्यांचा चहा घेतल्‍यास या आजाराची लागण होण्‍याची शक्यता कमी असते।
http://marathi।webdunia.com/
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वेळीच उपचार केल्यास ‘ स्वाइन फ्लू ’ बरा होतो. मात्र त्यासाठी लक्षणेआढळल्यावर तातडीने जवळच्या ‘ स्वाइन फ्लू ’ उपचार केंद्रावर जाणेआवश्यक आहे.

आतापर्यंत देशात पाच जणांचा ‘ स्वाइन फ्लू ’ मुळे मृत्यू झाला आहे. या सगळ्यांनाच ‘ स्वाइन फ्लू ’ ची लागण झाल्याचे लक्षात येऊन त्यांच्यावर टॅमिफ्लू गोळ्या देऊन उपचार सुरू करेपर्यंत खूप वेळ गेला. त्यामुळे नागरिकांना ‘ स्वाइन फ्लू ’ ची लक्षणे आढळल्यास लगेच ‘ स्वाइन फ्लू ’ केंद्रावर येण्याचे चाचणी करुन घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करुन घेणे आवश्यक असल्याचे ससूनच्या डॉक्टरांनी सांगितले.

‘ स्वाइन फ्लू ’ ग्रस्तांपासून किमान सहा फूट लांब असलेल्यांना आजारी पडण्याचा धोका खूप कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एन-९५ मास्क किंवा नाका-तोंडासमोर सतत रुमाल धरण्यासारखा सोपा उपाय करुनही आजारी व्यक्ती स्वतःमुळे होणारा संसर्ग टाळू शकते , अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ‘ स्वाइन फ्लू ’ ग्रस्त व्यक्तीवर वेळीच टॅमिफ्लू गोळ्या देऊन उपचार केल्यास आजार नक्की बरा होतो , असेही डॉक्टर म्हणाले.

‘ स्वाइन फ्लू ’ ची लक्षणे

* सर्दी-पडसे , घसा खवखवणे , अंगदुखी , ताप या नेहमीच्या फ्लूच्या लक्षणाबरोबरच जुलाब आणि उलट्याचा त्रास होत असेल तर ‘ स्वाइन फ्लू ’ ची लागण असण्याची शक्यता असते.

* ही लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन आवश्यक ती चाचणी करून घ्यावी.

* साथीच्या रोगाच्या काळात खोकल्यातून हवेत पसरणा-या ड्रापलेट्सच्या मार्फत रोगाचा संसर्ग होतो.

उपाय :

* खोकताना तोंडावर रुमाल धरणे , सतत खोकणा-यांनी फेस मास्कचा वापर करणे.

* साथीच्या रोगांच्या कालावधीत दर दोन तासांनी कोमट पाण्याने हात धुवावेत , पाण्याची टंचाई असणा-या भागातल्या लोकांनी कोरड्या कागदाने हात पुसावेत.

* साथीच्या रोगाच्या काळात नाक , तोंड आणि डोळ्यांना वारंवार हात लावू नये , सार्वजनिक ठिकाणी जाण्याबरोबरच अनावश्यक प्रवासही टाळायला हवा.

* फ्लू झाल्यास घरगुती उपचार न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे।

http://maharashtratimes.indiatimes.कॉम

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आजाराची लक्षणं

ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षण आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणूच्या संसर्गावर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा शासनाकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. तथापि, या औषधांचा वापर खात्रीशीररित्या या विषाणूंचा संसर्ग झाल्यावरच होणे आवश्यक आहे. या औषधास विषाणूंकडून प्रतिरोध निर्माण होऊ नये यासाठी शासन ही काळजी घेत आहे.

याशिवाय वैयक्तिक संरक्षक साधने (पीपीई), एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क याचा पुरेसा साठा केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सर्व आंतराष्ट्रीय विमानतळावर तसेच बंदरांवर येणार्‍या परदेशी प्रवाशांची तपासणी वैद्यकीय पथकांच्या सहाय्याने सुरु आहे. [१]

आजार कसा टाळावा

आरोग्य विभागाने काय करावे आणि काय करू नये यासंबधीच्या मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये

1. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत,
2. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे,
3. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे,
4. खोकतांना- शिंकतांना तोंडाला रुमाल लावावा,
5. भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी,
6. पौष्टिक आहार घ्यावा

तर नागरिकांनी काय टाळावे हे देखील यात स्पष्ट केले आहे. यामध्ये

1. हस्तांदोलन अथवा आलिंगन देण्याचे,
2. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे
3. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत असे सांगितले आहे.
4. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेऊन घरीच विश्रांती घ्यावी,
5. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत .
6. तोंडावर मास्क लावावा.

हा आजार प्राणघातक नाही. योग्य उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो.

रोग निदान विषाणू तपासणी

याचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो.रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था" class="mw-redirect">राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था (पान अस्तित्त्वात नाही)">राष्ट्रीय संचारी रोग संस्था ("नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस'-एनआयसीडी), दिल्ली येथे प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. उपचार
कोणत्याही खासगी वैद्यकांना, खासगी डॉक्टरांना अथवा खासगी रूग्णालयांना उपचार देण्याची क्षमता नसून परवानगी नाही आहे.उपचार केवळ राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष">मान्यता प्राप्त शासकीय रूग्णालयातच उपलब्ध आहे आणि तसा तो शासकीय रूग्णालयातूनच घेणे बंधनकारक आहे।

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्यात वेगाने ‘ स्वाईन फ्लू ’ पसरत आहे. त्यामुळे जास्त लक्षणेआढळल्यास वैद्यकीय अहवालयेण्याआधीच संशयित ‘ स्वाईन फ्लू ’ पेशंटला टॅमिफ्लू औषधाच्या गोळ्यादेण्यात येणार आहेत. राज्याच्याआरोग्य विभागाने सगळ्या ‘ स्वाईनफ्लू ’ उपचार केंद्रांना तशा सूचनादिल्या आहेत. या वृत्ताला ससूनहॉस्पिटलचे डीन डॉ. जामकर यांनीदुजोरा दिला आहे.

ताप, सर्दी, खोकला, उलट्या होणेआदी लक्षणे आढळल्यावर रुग्णतपासणीसाठी येतात. त्यानंतरत्यांच्या नाक आणि घशातील द्रवपदार्थ पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूसंस्थेत (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉरव्हायरॉलॉजी अर्थात एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात येतो. संस्थेचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यासटॅमिफ्लू देऊन उपचार करण्यातयेतात. मात्र या पद्धतीने उपचार सुरूहोण्याआधीच तब्येत खूपखालावल्यामुळे औषधे देऊनही विशेषफरक पडला नाही आणि राज्याततिघांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवरजास्त लक्षणे आढळल्यास वैद्यकीयअहवाल येण्याआधीच संशयित ‘ स्वाईन फ्लू ’ पेशंटला टॅमिफ्लूऔषधाच्या गोळ्या देण्याचा निर्णयघेण्यात आला आहे.

उपचार पद्धतीतल्या या किरकोळ पणअतिशय महत्त्वाच्या बदलामुळे अनेकपेशंट लवकर बरे होतील, असे विश्वास ‘ स्वाईन फ्लू ’ वरु उपचार करणारेडॉक्टर व्यक्त करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------
आजपर्यंत बर्ड फ्लु ऐकलं होतं. मॅड काउ पण ऐकलं होतं . आता हा अजुन एक नविन प्रकार दिसतोय..

नावावरुन तर तो चक्क डुकरांच्यामुळे होणारा ( म्हणजे पाकिस्तान्यांच्या मुळे नाही) रोग वाटतो.खरं तर हा फ्लु डुकरांच्या मधे अगदी कॉमन आहे. अमेरिकेत डुकरं पाळणं (खाण्यासाठी) हा एक मुख्य धंदा आहे. अगदी आपल्या इथे ज्या प्रमाणे पोल्ट्रीज आहेत तशात तिथे पिगरीज आहेत. सॉसेजेस हा तिथला आवडता पदार्थ.आत्ता पर्यंत डुकरांना पाळतांना देण्यात येणारे व्हॅसिन्स योग्य रितिने रोगाला अटकाव करित होते. पण आता मात्र व्हायरस अजिबात दाद देइनासा झालाय, त्या व्हॅसिन्स ला. डुकरांच्या सान्निध्यात काम करणाऱ्या लोकांना पण हा रोग होऊ शकतो.

२००४ मधे युनिव्हर्सिटी ऑफ लोवा मधे एका सर्विलन्स स्टडी मधे हे सिध्द खालं होतं की , जे लोकं पोल्ट्री आणि स्वाइनरी हॅंडल करतात त्यांना झोनोटीक इन्फेक्शन विथ इन्फ्लुएन्झा व्हायरस होऊ शकतं .तसा, सहजा सहजी हा रोग माणसांना होत नाही, पण एकदा झाला की मग मात्र फार वेगाने स्प्रेड होऊ शकतो.

१९७६, नंतर १९८८ नंतर आताच २००९ मधे ह्या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले .आताच्या या अटॅक मधे १७२ डेथ मेक्सिको मधे आणि २० डेथ आणि १००० च्या वर इन्फेक्शन्स झालेले आहेत.

कांही दिवसांपुर्वी एक लेख वाचला होता कृष्ण उवाच मधे सामंत साहेबांचा. त्यात त्यांनी म्हंटलं होतं की अमेरिकेत रहाणाऱ्या भारतियांनी विनाकारण अमेरिकन्सचं अंधानुकरण करु नये. बिफ, पोर्क, बेकन्स खाणं टाळावं. आजच्या परिस्थितित तेच अगदी संयुक्तिक वाटतं. बेकन कींवा पोर्क खाण्यामुळे पण हा रोग होऊ शकतो असे कांही लोकांचे म्हणणे आहे पण कांही डॉक्टर्स म्हणतात की वेल कुक्ड फुड खाल्लं तर कांही धोका नाही.

याचे सिंपटम्स पण अगदी आपल्या नेहेमीच्या फ्लु सारखेच असतात. गळणारं नाक,घशातली खवं खवं ताप, थकवा, भुक न लागणं, खोकला, उलट्या आणि डीसेंट्री, त्यामुळे ह्या रोगाला इतर रोगांपासुन वेगळं आयडॆंटीफाय करणं पण तसं कठिणंच. तरीही अमेरिकेत डॉक्टर्सना सांगण्यात आलेलं आहेतुमच्या कडे कुठलिही व्हायरल इन्फेक्शन ची केस किंवा रिस्पायरेटरी इन्फेक्शन ची केस आली तर “स्वाइन व्हायरस” टेस्ट करा म्हणजे हा रोग पसरणे थांबण्यास मदत होईल..

हे कळतं कसं ? किंवा हे कन्फर्म कसं केलं जातं की एखाद्याला स्वाइन फ्लु आहे म्हणुन? तर नाकातलं फ्लुड आणी कफ यांच्यावरपॅथॅलॉजिकल टेस्ट्स केल्या की मग कळतं स्वाइन फ्लु आहे की नाही ते.

हा डीसिझ कॉंटेंजिनियस आहे. खोकल्यामुळे प्रसारित होणारे जर्म्स मुळे हा रोग पसरु शकतो. शक्यतोवर हा रोग झालेल्या माणसाबरोबर शेक हॅंड केल्यास साबणाने हात धुणे अतिआवश्यक आहे. हा रोग शिंकांमुळे पण पसरु शकतो. एखाद्या माणसाला हा फ्लु झाला तर तो सहाजिकच खोकला आल्यावर तोंडासमोर हात धरेल आणि मगच खोकेल. कींवा शिंक आली तरी पण तो नाकासमोर हात धरेल. असे करण्यामूळे रोगाचे जर्म्स हातावर ट्रान्स्फर हौऊन नंतर मग लॅपटॉप्स, टेलिफोन्स, टेबलटॉप्स वर हा व्हायरस फ्लोट होतो. इथुन हा डोळॆ, नाक, किंवा तोंडावाटे दुसऱ्याच्या शरिरात प्रवेश करु शकतो.

अल्कोहल बेस्ड जेल्स, किंवा फोम वापरला तर ह्या व्हायरस पासुन बचाव होऊ शकतो. शोशल डीस्टंन्सिंग ही एक दुसरी साधी पध्दत पण व्हायरस दुर ठेवण्यास मदत करु शकते. डब्लु एच ओ ने गाइडलान्स मधे सांगितलंय की ज्याला फ्लु लाइक सिम्पटम्स असतिल त्याने हा फ्लु स्वाइन फ्लु नाही, हे कन्फर्म होई पर्यंत इतरांपासुन दुरच रहावे.

अमेरिकेत सध्या टॅमिफ्लु किंवा रेलेन्झा हे ड्रग्ज प्रिव्हेंटिव्ह म्हणुन दिले जातात.भारत, आणि इतर एशियाई देशात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन येणाऱ्या प्रवाशांची टेस्ट करणे सुरु केले आहे. अगदी ह्याच प्रकारच्या ऍक्शन्स बॅंकॉक मधे पण घेण्यात आल्या आहेत. बॅंकॉक मधे तर फॉरिनर्स ला परत पाठवा असाही प्रस्ताव आहे.

आता हा रोग कधी आटोक्यात येइल ते काळच ठरवेल.
http://kayvatelte.wordpress.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा