मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

बुधवार, २७ मे, २००९

सम्पूर्ण कामजीवन - डॉ - श्रीनिवास कशालिकर

KAMAJEEVAN_01 KAMAJEEVAN_01 agrawal2602668244 A Marathi book by Dr. Shriniwas Kashalikar on sexology; describing the scientific and sublime aspects of sex life and its practical experience in everyday life.

मंगळवार, २६ मे, २००९

शनिवार, १६ मे, २००९

स्वस्थ आरोग्यासाठी हस्त मुद्रा

स्वस्थ आरोग्यासाठी हस्त मुद्रा - स्वस्थ आरोग्यासाठी हस्त मुद्रा - Vishwas Bhide हातांची पांच बोटे पंच महाभूतांच्या पांच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. बोटांच्या अग्रांच्या जुळलेल्या वा ती अग्रे बोटांच्या मुळाशी लावलेल्या स्थितीला 'मुद्रा' म्हणतात. दैनिक व्यवहारात स्वस्थ आरोग्यासाठी या मुद्रांचा बराच लाभ होतो.

सोमवार, ११ मे, २००९

स्त्रीरोग

गर्भधारणा

गर्भ राहिल्याचे निदान डॉक्टर कसे करतात.

मासिक पाळी चुकल्यानंतर चार दिवसात तपासणी करून गर्भधारणा झाली आहे किंवा नाही याचे निदान होऊ शकते, अर्थात मासिक पाळीच्या तारखेनंतर दहा दिवसांनी जर तपासणी केली तर ती एकदम बरोबर असू शकते। साधारणपणे लघवीची तपासणी केली जाते पण रक्त तपासणी जास्त योग्य आहे. रक्त तपासणीने गर्भाचे वय देखील समजू शकते, कारण काही वेळा गर्भधारणेच्या काळाबद्दल शंका असते. जर तुमची मासिक पाळी दोन आठवडे आली नसेल तर तुमचे डॉक्टर ओटीपोट तपासून गर्भधारणा झाली किंवा नाही ते सांगू शकतात, अर्थात रक्त किंवा लघवी तपासणी करूनच ते निश्‍चित निकाल देतील.

गरोदरपणीचे पोषण
समजूतदारपणे जर पोषक पदार्थ आहारात घेतले तर नक्कीच तुमचे आणि तुमच्या बाळाचे पोषण चांगले होईल. जास्त उष्मांक मिळविण्यासाठी गरोदरपणी तुम्हाला बदल करावे लागतील. चांगले पोषण होण्याची गुरूकिल्ली समतोल आहार आहे.
मांस, कोंबड्या, मासे, कोरडे बीन्स, अंडी आणि टणक कक्वाची फळे
यातून ‘ब’ जीवनसत्व, प्रथिन, आयर्न आणि झिंक पुरविले जाते. शिजवलेल्या मटणातून, कोंबड्यामधून किंवा माशांमधून २-३ औंस मिळते.
या समुहातील इतर पदार्थांमध्ये, एक औंस मटन, १/२ कप शिजविलेले कोरडे बीन्स, एक अंडे किंवा २ टेबलस्पून पीनट बटर बरोबर असते.
दूध, योगर्ट, आणि चीज
हे पदार्थ म्हणजे प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्वांचा साठा असतो. एक कप दूध किंवा योगर्ट, १ १/२ औंस नैसर्गिक चीज, किंवा २ औंस प्रक्रिया केलेले चीज याबरोबर असते.

जेव्हा शक्य असेल तेव्हा कमी चरबी असलेले पदार्थ निवडावेत, साय, मलई वगैरे पूर्णपणे काढलेले किंवा थोड्या प्रमाणात काढलेले दूध, जर तुम्हाला तुमच्या सुपर बाजारात उपलब्ध होतील यात योगर्ट- दूध आणि कमी दुग्धशर्करा असलेले पदार्थ असतात. जर तुम्हाला असे जाणवले की, दुधाचे पुरेसे पदार्थ उपलब्ध होत नाहीत, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून कॅल्शियमयुक्त इतर पदार्थांची माहिती घ्या.
फळे
हा समूह जीवनसत्व ‘अ’ ‘क’ पोटॅशियम आणी तंतू पुरविते. एक मध्यम सफरचंद, केळे किंवा संत्री, १/२ कप कापलेले, शिजवलेले किंवा डब्यातील फळे, किंवा सहा औंस फळांच्या रसाबरोबर असते. बरीज, सायट्रस फळे किंवा रस, कलिंगड आणि इतर फळे यात चांगल्या प्रमाणात जीवनसत्वे ‘ क’ असते. मनुका आणि Prunes देखील चांगले असतात.
भाज्या
यात जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ आणि आयर्न व मॅग्नेशियम सारखे खनीजपदर्थ असतात ही चरबी कमी असते आणि तंतूमय असतात, त्यामुळे बध्दकोष्ठता होत नाही. एक कप कच्ची पालेभाजी (पालक, लेट्यूस, Lroccoli), १/२ कप इतर शिजवलेली किंवा कच्ची पालेभाजी (गाजर, रताळी, मका, पीज्‌. बटाटे) किंवा ३/४ कप भाजीच्या रसाबरोबर असते.
पाव, (Ereals, तांदूळ आणि Pastas)
यातून शक्तीचा मुख्य स्त्रोत कर्बोदके (स्टार्च) मिळतो, त्याबरोबरच जीवनसत्वे, खनीजपदार्थ आणि तंतूमय पदार्थ मिळतात. पावाचा एक स्लाईस, एक औंस Cereal, किंवा १/२ कप शिजविलेले Cereal, तांदूळ किंवा पास्ता. या बरोबर असतो. शक्यतो संपूर्ण धान्यापासून-कडधान्यापासून बनविलेले आणि कमी साखर असलेले पदार्थ घ्यावेत.
चरबी, तेल आणि मिठाई
या पदार्थामध्ये उष्मांक जास्त असतात आणि जीवनसत्व किंवा खनीजपदार्थ कमी चरबी असलेल पदार्थ घेण्याचा प्रयत्‍न करावा.
लोहाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ
बर्‍याचशा स्त्रियांमध्येही प्रमाणात रक्तातील लाल पेशी कमी असतात। मासिक पाळी, अनियमित व अयोग्य आहार किंवा आधीचे गरोदरपण ही त्याची काही कारणे होत. म्हणून गरोदर होण्याआधी पासून तुम्ही तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढविल पाहिजे. मांस मनुका, सोयाबीनची उत्पादने, पालक आणि गव्हाचे सत्व यांच्या प्रयोगाने तुमच लोहाचे प्रमाण वाढेल गरोदर असताना लोहाची गरज रोज दुप्पट होत असते.

प्रसूतीची सुरूवात कशी होते?

प्रत्येक स्त्रीमध्ये प्रसूतीची सुरूवात वेगवेगळ्या तर्‍हेने होते. गर्भाशयाचे स्नायू एका विशिष्ट लयीत आकुंचन पावतात, त्यामुळे गर्भ पुढे जाण्यास मदत होते.

गर्भाशयाची मान रूंदावते आणि पाण्याची पिशवी फुटणे या काही खुणा आहेत. कळा सुरू केल्यानंतर लगेच रूग्णालयात जाण्याची गरज नसते, विशेषत: तुमच्या पहिल्या गर्भारपणात प्रसूतीची पहिली पायरी काही तासानंतर संपते, त्यामुळे तुम्ही घरीच जास्त आरामात राहू शकता, पण पुढील सूचनांसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लगेच कळविले पाहिजे.

गर्भारपणाच्या संपूर्ण काळात तुम्हांला गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन झाल्याचा अनुभव येईल. परंतु ते खोटे असू शकते. प्रसूतीच्या खर्‍या वेदनांमध्ये आकुंचनक्रिया लयबध्द असते, जास्त त्रासदायक असते आणि नियमित अंतराने होत असते. तुम्हाला थोडे रक्त सुध्दा दिसेल. (जर तुम्हाला अचानक खूप रक्तस्त्राव झाला किंवा हळुहळू रक्तस्त्राव होऊ लागला तर लगेच रूग्णालयात जा.)

पाण्याची पिशवी फाटण्याची परिणाम स्वच्छ स्त्राव दिसण्यात होतो, तेव्हा स्नायूंच आकुंचन झाल्याचे लक्षात ही येत नाही. तुमच्या ओटीपोटात दुखते किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात. पण तीव्र

वेदना/कळा किंवा चक्कर येणे ही धोक्याची लक्षणे आहेत, त्यामुळे तुम्ही लगेच रूग्णालयात जाणे आवश्यक आहे. तुम्हाला असे सुध्दा जाणवेल की बाळ खाली खाली येत आहे. ही सगळी लक्षणे प्रसूतीपूर्वीची लक्षणे आहेत.

खोट्या कळा आणि प्रसूतीची खरी सुरूवात यातील फरक सहजपणे ओळखणे पहिल्या बाळंतपणात शक्य नसते. स्नायूंचे आकुंचन खर्‍या कळा खोट्या कळा वेळा नियमित आणि वाढत्या दराने बहुधा अनियमित असतात वेळ कमी कमी होत जाते. आणि वेळेतील दरात काही बदल होत नाही. हालचाल परिणाम स्नायूंच्या आकुंचनावर काही आकुंचन थांबते. (उदा. चालणे) परिणाम होत नाही. जागा मागच्या बाजूने सुरू होऊन बहुधा पुढेच येतात. आकुंचनाची शक्ती विशिष्ट दराने वाढत असतात. बहुधा कोणतीही वाढ होत नाही व अशक्त असतात. जर तुम्हांला खरंच कळा येत असतील तर त्या एक एक तासाने येऊ लागल्यावर सांगा. कळ केव्हा सुरू झाली आणि केव्हा संपली ती वेळ लिहून ठेवा. जेव्हा दर पाच मिनिटांनी कळा यायला सुरूवात होईल, तेव्हा तुम्ही रूग्णालयात जा.

स्नायूंचे आकुचन आणि प्रसरण होत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आणि श्वासोच्छवासाचे तंत्र बर्‍याच महिला अपत्यजन्मापूर्वी घेतल्या जाणार्‍या वर्गांमध्ये शिकतात, त्यामुळे त्या अपत्याजन्माच्या वेळी होणार्‍या त्रासाला तोंड देऊ शकतात, मात्र काही वेळा वेदना कमी करणार्‍या औषधांपासून तुमची पूर्णपणे सुटका होऊ शकत नाही. वेदना कमी करणारी काही औषधे फक्त मोठ्या किंवा शिकविणार्‍या रूग्णालयांमध्येच उपलब्ध असतात. पण बाकी बरीचशी सगळ्या रूग्णालयांमध्ये उपलब्ध असतात.

ऍनेसथिसिऑलॉजिस्ट - जे वेदनांपासून आराम देण्यात तज्ञ आहेत - ते तुमच्या डॉक्टरांबरोबर काम करतात आणि तुमची वेदनांपासून सुटका करण्यासाठी सगळ्यात योग्य पध्दत निवडतात. प्रसूतीच्या कळांमध्ये वाढ करण्यासाठी देखील औषधे वापरली जातात.

विशिष्ट शस्त्रक्रियेने प्रसुति - सिजेरियन
सिझेरियन सेक्शन म्हणजे शस्त्रक्रियेने बाळांना जन्म देण्याची पध्दत होय. यात आधी उदराला छेद देउन नंतर गर्भाशयाला छेद दिला जातो व बाळाला जन्म दिला जातो. हा छेद बहुतेक जननेंद्रियांच्या आसपासच्या केसाळ भागात दिला जातो. आणि हा छेद ‘बिकीनी कट’ या नावाने प्रसिध्द आहे. काही केसेसमध्ये हा छेद गर्भाशयाच्या खालच्या बाजूपासून उदराच्या वरच्या भागापर्यंत दिला जातो. काही वेळा कळा सुरू होण्याआधी शस्त्रक्रिया केली जाते, याची अनेक कारणे आहेत.
  • Having Placenta previa
  • Preeclampisa
  • मधुमेह (बाळ जर खूप मोठे असेल तर)
  • ओटीपोटाचा भाग जर बाळाचे डोके येउ न शकण्याइतका छोटा असेल
  • Rh - रोग, रक्ताचा एखादा रोग
  • जेव्हा बाळाचे डोके खाली नसेल, तेव्हा अशा स्थितीत विशिष्ट शस्त्रक्रियेने (Cesarean) प्रसुति केली जाते.
विशिष्ट प्रकारची शस्त्रक्रिया केली कशी जाते?
जर ही शस्त्रक्रिया आधीपासून ठरविलेली नसेल, तर तुमचे डॉक्टर त्याची आत्ता का गरज ते स्पष्ट करतील आणि यात कोणते धोके आहेत ते देखील सांगतील. बर्‍याचशा रूणालयात तुमच्या बाळाच्या जन्मात भागीदार असणार्‍यास या शस्त्रक्रियेच्या वेळी उपस्थित राहू देतात. या शस्त्रक्रियेला साधारण एक तास लागतो आणि त्यात खालील टप्प्यांचा समावेश होतो.
  • तुमच्या हातात सुई (IV) टोचली जाते. शस्त्रक्रियेच्या वेळी जर औषधे देण्याची गरज भासली तर ती यातून दिली जातात.
  • ओटीपोटाचा भाग निर्जंतुक केला जातो आणि जननेंद्रियाच्या आसपासचे केस काढले जातात.
  • परस्पर - जुळणी आणी इतर तपासण्यांसाठी रक्त घेतले जाते.
  • भूल दिली जाते जी मणक्यात दिली जाऊ शकते किंवा संपूर्ण दिली जाते. मूत्राशयात रबरी नळी (कॅथेटर) घातली जाते.
  • शस्त्रक्रियेच्या वेळी त्या मार्गे मूत्रविसर्जन होऊ शकते। उदराला आणि गर्भाशयाला छेद देणे। या छेदातून बाळ आणि नाळ बाहेर काढणे. नंतर छेद शिवून टाकणे.

रजोनिवृत्ती

एस्ट्रोजन कमी होणे, प्रौढात्वाकडे जाणे आणि तणाव निर्माण होणे ही लक्षणे संप्रेरकाच्या बदलामुळे स्त्रियाच्या वयाच्या ४५ व ५५ व्या वर्षी दिसून येतात. यानंतर स्त्रिची मासिक पाळी पूर्णपणे थांबते. पुररूत्पादनाची क्रिया संपल्याचे हे लक्षण असते.

रजोनिवृत्तीमुळे जे भावनिक बदल होतात ते खालील प्रमाणे
  • राग येणे.
  • सारखी मन:स्थिती बदलणे.
  • एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे.
  • तणाव, अस्वस्थता, खिन्नता वाढणे.
  • निद्रानाश
रजोनिवृत्तीशी संबंधित शारीरिक बदल/लक्षणे
कमरेतून किंवा छातीतून गरम वाफा सुरू होतात त्या मान आणि चेहर्‍यापर्यंत जातात आणि काही वेळा संपूर्ण शरीरात पसरतात. याबरोबर काही वेळा हृदयाचे ठोके जलद पडतात. अनियमित मासिक पाळी, यात पुढील गोष्टींचा समावेश होतो:
  • मासिक पाळी काही महिने थांबते आणि पुन्हा सुरू होते, जी जास्त दिवस चालते. काही वेळा खूप रक्तस्त्राव आणि/किंवा रक्ताच्या गुठळ्या पडतात (यामुळे रक्त कमी होऊन अशक्तपणा येतो).
  • मूत्राशयाचे स्थितीस्थापकत्व कमी होणे, त्यामुळे स्त्राव अगर उत्सर्जनावर नियंत्रण ठेवता येत नाही (उदा. जेव्हा तुम्हाला खोकला येतो, शिंका येतात तेव्हा थोड्या प्रमाणात मूत्रोत्सर्जन होते).
  • डोकेदुखी, चक्कर येणे.
  • चेहर्‍यावरील केसांची वाढ होते.
  • स्तन संवेदनशील होणे.
  • स्नायूंची स्थितीस्थापकत्व आणि शक्ती कमी होणे.
  • पोटाच्या वरच्या भागात सूज येणे.
  • हाडे ठिसूळ होतात, त्यामुळे हाड मोडण्याची शक्यता वाढून त्याच्या टोकाशी कडक पदार्थ तयार होण्याचा संभव असतो.
  • ऍस्ट्रोजनची पातळी कमी झाल्यामुळे हृदयाचा झटका येण्याचा धोका संभवतो.
  • खिन्नता आणि/किंवा अस्वस्थतापणा दूर करण्यासाठी काही स्त्रियांना औषधे घेण्याने फायदा होतो.
  • गरम वाफा येण्याच्या स्थितीत काही उपशामक औषधांचा उपयोग होतो
स्रोत - आरोग्य डॉट कॉम



शनिवार, ९ मे, २००९

कुशाग्र बुध्दी साठी...

ह्या वर्षी अगदी सुरुवाती पासून व्यवस्थित अभ्यास करून हमखास यश मिळवण्याचा निर्धार ज्यांनी केला आहे आणि तशी सुरुवात पण केली आहे अशा विद्यार्थी मित्रांसठी हा विषय नक्कीच मोलाचा ठरेल.
‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही. आपले मूल सर्व क्षेत्रात उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हावे असे स्वप्न सर्वच आई-वडील पाहात असतात. बौध्दिक विकासासाठी किंवा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आज बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत व दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. त्यापैकी नेमकी कोणती औषधे घ्यावी किंवा कोणते उपचार करावे हे कळेनासे होते. आपले उत्पादन कसे सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची तर जणु चढाओढच लागलेली असते. अशावेळी कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर ठेवू नये हे कळेनासे होणे स्वाभाविक आहे. अशा उत्पादनां पैकी काय घ्यावे, किती प्रमाणात घ्यावे ह्या औषधांशिवाय आणखी काय उपाय आहेत, आहार काय असावा, व्यायामाचे महत्व काय, देवपूजा किंवा मोठ्या व्यक्तींना नमस्कार करण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे, ज्ञान ग्रहण करण्याचे कार्य नेमके कसे होते, ग्रहण केलेले ज्ञान कशा प्रकारे साठवले जाते, ते आठवण्याची क्रिया नेमकी कशी होते, ह्या व अशा प्रकारच्या अनेक शंका आपल्या मनाला रोज भेडसावत असतील. ह्या सर्व शंकांचे समाधान शास्त्रीय दृष्टिकोनातून बघूया.

तीन स्टेप प्रोग्रॅम:
पहिली पायरी: ज्ञान ग्रहण करण्यासाठी शरीर पाच ज्ञानेंद्रियांचा प्रामुख्याने उपयोग करते. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक अशा पाच इंद्रियांना पंचज्ञानेंद्रिय म्हणतात. ह्या इंद्रियांमुळे मेंदू पर्यंत ज्ञान संवेदना पोचविण्याचे कार्य शरीर सहज करू शकते. हे काम योग्य प्रकारे होण्यासाठी ही पाचही इंद्रिये स्वच्छ, तंदुरुस्त व त्यांच्या माध्यमाने संवेदना वहन करण्यासाठी असलेल्या नाड्या(Nerves) योग्य प्रकारे स्निग्धता युक्त (properly lubricated) असणे आवश्यक आहे. सर्दी झाली की वास येत नाही हे अगदी नेहमीच्या बघण्यातले उदाहरण. म्हणजे त्या इंद्रियामधे निर्माण झालेल्या दोषामुळे वासाची संवेदना मेंदूपर्यंत जात नाही. स्निग्धता इंद्रियांना किती आवश्यक आहे हे समजण्या साठी एक वाक्प्रचार आपण लहान पणा पासून ऐकत आलो आहोत, “डोळ्यात तेल घालून पहा, किंवा डोळ्यात तेल घलून लक्ष दे” म्हणजेच ज्ञानेंद्रियांची शक्ती किंवा कार्यक्षमता उत्तम राखण्यासाठी तेल किंवा तुपासारखा स्निग्ध पदार्थ किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल. आयुर्वेदात तुपाच्या गुणधर्मां विषयी फार सुंदर वर्णन केले आहे, ते असे:
“शस्तं धी स्मृति मेधाऽग्नि बलायुः शुक्र चक्षुषाम्….” म्हणजेच बौध्दिक विकासासाठी व कार्यक्षमता उत्तम राखण्या साठी ज्ञान ग्रहण, ज्ञानाची साठवण व स्मरण अशा तीनही कामांसाठी गायीचे तूप श्रेष्ठ आहे. नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. मेंदू वर कार्य करणारी औषधे नाकाच्या मार्गे दिली तर त्यांचा परिणाम लवकर होतो. कारण ब्लड-ब्रेन बॅरियर यंत्रणे पासून मुक्त अशा सोप्या मार्गाने ही औषधे काम करतात. अलिकडे मधुमेहा साठी नाकाच्या मर्गे इन्सुलिन देण्याचे नवीन तंत्र प्रचलित होत आहे. ह्याच तत्वावर आधारित उपचार पध्दती आयुर्वेदात नस्य विधी म्हणून वर्णन सापडते. नाकाच्या मर्गाने टाकलेले औषध रक्तात शोषले जाण्यासाठी फक्त १.५ मिनिटांचा अवधी पुरेसा होतो असे प्रयोगांती सिध्द झाले आहे. केशराचे वस्त्रगाळ चूर्ण शास्रशुध्द विधीने मूर्छित केलेल्या गायीच्या तुपामध्ये सिध्द करून हे तूप नियमितपणे नाकात चार चार थेंब टाकावे. अभ्यासातून वेळ काढणे कठीण होत असेल तर आठवड्यातून दोन दिवस तरी हे तूप नाकात जरूर टाकावे. त्यामुळे नाका बरोबरच कान व डोळ्यांची पण शक्ती सुधारते, डोळ्याने वाचलेला व कानाने ऐकलेला विषय किंवा अभ्यास सहज पणे मेंदू पर्यंत विना-अडथळा पोचतो. बोटात अंगठी जात नसेल तर त्या ठिकाणी तेल किंवा दुसरा काही स्निग्ध पदार्थ लावला की ती क्रिया अगदी सहज होते. ह्या उपचारा मुळे काही त्रास न होता नकळतपणे अनेक फायदे होऊ लागतात. कोणाला वरच्या वर सर्दी होत असेल तर तो त्रास नाहिसा होतो, केस गळत असतील तर थांबून जातात, वाचून वाचून डोळ्यांना थकवा वाटत असेल तो थकवा गायब होतो, डोळ्यांची आग थांबते, कानात दडे बसत नाही, चष्म्याचा नंबर हळू हळू कमी होत जातो व कायम साठी जऊ पण शकतो, डोकेदुखीचा त्रास असल्यास तो पण आपोआपच ठीक होतो. हे नस्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्या नंतर करणे योग्य आहे. ह्या वेळी केल्याने अधिक फायदा होतो. नाकात थेंब टाकल्या नंतर ५ मिनिटे आडवे पडून राहावे. कधी कधी हे औषधी तूप घशात उतरल्या सारखे जाणवते. त्यावर घोटभर कोमट पाणी प्यावे. मेंदूची अभ्यास ग्रहण करण्याची क्षमता म्हणजेच आकलन शक्ती चोख राहते व त्यामधे काही अडथळा न येता विषयांचे आकलन सहज होते. जपान मधील निहॉन विद्यापिठात शास्त्रज्ञ हिरोशी साहितो ह्यांनी बौध्दिक विकासासाठी व स्मरणशक्ती वाढविण्या साठी केशराच्या उपयुक्ततेवर आपले संशोधन प्रसिध्द केले आहे. आयुर्वेदानुसार गायीचे तूप व केशर असलेले "क्लेव्हरिन नेझल ड्रॉप्स" नावाचे उत्पादन बाजारात मिळते.

दुसरी पायरी: ज्ञान योग्य प्रकारे साठवण्या करिता आवश्यक अशी रचना मेंदूच्या पेशींमध्ये घडवून आणण्याचे कार्य ह्या मुळे होते. ब्राह्मी, शंखपुष्पी, शतावरी, अश्वगंधा सारख्या वनस्पतींमुळे मेंदूच्या पेशींमधील प्रथिनांचे संहनन सुधारते असे शास्त्रीय प्रयोगां मधे आढळून आले आहे. वाचनालयात नवीन पुस्तकांची भर पडली तर कपाटांची संख्या वाढवावी लागते त्याच प्रमाणे अभ्यास वाढू लागला की मेंदूच्या क्षमते मधे वाढ करावी लागते. सध्या बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक सर्व औषधे ह्याच प्रकारे कार्य करतात. ह्या औषधांचा उपयोग होण्याची सुरुवात साधारणतः १५ दिवसांत होते. हा फरक थर्मोमीटर ने ताप मोजण्या इतका सहज मोजता येत नही हे खरे पण मेंदूच्या क्षमते मधे वाढ कशी होते हे देश-विदेशी झालेल्या असंख्य प्रयोगांमधे निर्विवाद पणे सिद्ध झाले आहे. शिवाय दीर्घकाळ पोटात घेऊन काही दुष्परिणाम होत नाही असे अभ्यासकांचे ठाम मत आहे. ह्या वनस्पतींचे इतर अनेक गुण आहेत. रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण सुधारते, रोग-प्रतिकार शक्ती सुधारते, स्नायूंचे बळ वाढते, कॅल्शियमची झीज भरून निघते, स्टॅमिना वाढतो, जखमा लवकर भरून निघतात, केसांमधील मेलॅनिन वाढते त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची शक्यता कमी होते. बाजारात उपलब्ध असलेले उत्पादन घेतांना मात्र त्यामधील घटकांचे प्रमाण योग्य आहे ह्याची खात्री करणे आवश्यक आहे. कमी प्रमाणात घटक असण्यामुळे अपेक्षित गुण ठराविक कालावधी मधे मिळू शकत नाही. मुलांसाठी उत्पादन घेतांना चवीचा विचार करणे आवश्यक आहे. ह्या सर्व वनस्पती चांगल्याच कडू असतात त्यामुळे मुले नियमित पणे घेतील की नाही? नियमित पणे घेण्यासठी आवडीची चव आणि स्वाद असणे तितकेच महत्त्वाचे आहे. तोंड वाकडे करीत कसेतरी घशाखाली ढकललेल्या औषधाचा उपयोग जेमतेमच होईल. मुलाने आपणहून मागणी करावी अशा छान छान चवींची उत्पादने आता सहज मिळू लागली आहेत. बाजारात "क्लेव्हरॉल" नावाने एक चॉकलेट स्वाद असलेले दुग्धपेय तयार मिळते. दिवसातून एक वेळा कपभर दुधातून हे पेय घेणे पुरेसे होते .

सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी: केलेला अभ्यास बरोबर योग्य वेळी आठवणे ह्याला स्मरणशक्ती म्हणतात. स्मरणशक्तीची यंत्रणा मेंदूच्या विशिष्ट भागातून (हिपोकॅम्पस) नियंत्रित केली जाते. त्याला योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी नाकाच्याच मार्गाचा उपयोग होतो. फीट आल्यावर कांदा फोडून नाकाजवऴ धरतात व त्याच्या उग्र वासाने बेशुध्द अवस्थेतून झटकन शुध्द येते. विशिष्ट वास घ्राणेंद्रिया द्वारे घेण्यामुळे मेंदूतील स्मरणयंत्रणा कार्यरत होते. ह्या विषयी जर्मनी मधे काही संशोधकांनी प्रयोग केले. विद्यार्थ्यांच्या एका समूहाला एक चाचणी प्रश्नसंच देऊन एका खोलीत झोपण्याची व्यवस्था केली. झोपेत असतांना त्या खोलीत विशिष्ट सुगंधाची रात्री ४/५ वेळा फवारणी केली. त्या त्या वेळी मेंदूचा एफ् एम् आर् आय् (fMRI) स्कॅन घेतला. तेव्हां मेंदूतील हिपोकॅम्पस ची क्रिया अधिकच गतिमान होते असे लक्षात आले. दुसरा दिवस उजाडल्या नंतर त्यांची परीक्षा घेतली त्यावेळी त्यांना ९७ % उत्तरे अचूक सांगता आली. ज्या खोलीत अशी फवारणी केली नव्हती त्यांची फक्त ८४ % उत्तरे अचूक आली. ह्या वरून आपल्याला लक्षात येते की विशिष्ट वासामुळे मेंदूतील स्मरण शक्ती अधिक कार्यरत होते. ह्या संशोधनावर आधारित वेखंड, जटामांसी सरख्या बुध्दीवर्धक आणि सुगंधी वनस्पतीं पासून एक औषधी अगरबत्ती तयार केली. अभ्यास करतांना व रात्री झोपतांना खोलीत ही अगरबत्ती लावावी. हा उपाय करण्याने अभ्यास केलेला विषय मेंदूतील स्मरणयंत्रणेमध्ये पक्का बसतो व योग्य वेळी आठवण करून देण्यासाठी मदत करतो. तज्ञांच्या मर्गदर्शनाखाली "क्लेव्हरोमा" नावाने ही अभिनव अगरबत्ती तयार केली आहे व नव्यानेच बाजारात उपलब्ध केली आहे.

देवाची भक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार: देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे हे समजणे आपल्याला नक्कीच आवडेल. कॉर्टिझॉल नामक एक द्रव-पदार्थ (हॉर्मोन) भीती मुळे शरीरात निर्माण होतो आणि जेवढा अधिक कॉर्टिझॉल निर्माण होईल तेवढा तो मेंदूच्या पेशींना मारक किंवा घातक असतो हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिध्द झाले आहे. लहान मुलाला उंच फेकल्यावर तो हसतो कारण त्याला खात्री असते की आपल्याला वरती फेकणारा जो कोण आहे तो खाली पडू देणार नाही, आपल्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही. देवाची भक्ती किंवा वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळे नकळतपणे मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो ज्याने कोणत्याही संकट किंवा अडचणीच्या वेळी निर्माण होणारी भीती व त्याचा परिणाम म्हणून कॉर्टिझॉलचा आघात कमी होतो. अर्थात, मेंदूवर होणारा विपरीत परिणाम ह्या प्रकारे सहज टाळता येतो. घरातून बाहेर प्रवासाला जातांना देवाला आणि वडील माणसांना नमस्कार करण्यामागे हाच उद्देश होता. पूर्वी चांगले रस्ते, सुरक्षित वाहाने नव्हती. प्रवासासाठी बैलगाडी किंवा घोडे वपरले जात. कधीकधी तर एका गावाहून दुसरे गाव गाठण्यासाठी पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय पाऊस, वादळ, खान-पान, जंगलातील वन्यप्राणी अशा अनेक संकटांचा सामना करण्याचे धैर्य फक्त देवभक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार करण्यामुळेच मिळू शकते. संकट प्रसंगी तातडीचा नेमका आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता ह्या एकाच गोष्टीमुळे शक्य होते. त्यामुळे येणारे संकट काही टळणार नाही, पण अशा संकट प्रसंगी सारासार विचार करण्यासठी बौध्दिक क्षमता आणि मानसिक धैर्य संतुलित राहण्यस नक्कीच मदत होते. पूर्वी संतोषी मातेविषयी निनावी पोस्टकार्ड येत असत. त्यात असलेला मजकूर जसाच्या तसा लिहून १६ पत्ते टाकून पाठविण्यास सांगितले असायचे. हल्ली तसा प्रकार ईमेलच्या माध्यमाने चालतो. असे न केल्यास आजार, मृत्यू, नोकरी जाणे अशी भीती उत्पन्न केली जाते. केल्यामुळे काही खास फळ मिळत नाही हे सर्वांना माहिती असून देखिल अशी पत्र किंवा ईमेल ९९% लोक फॉरवर्ड करतातच कारण 'भीती'. असे केल्याने विशेष नुकसान तर होत नाही, झाला तर फायदाच होईल. त्यामुळे भीती पसून उत्पन्न होणारा कॉर्टिझॉलचा मेंदूवर होणारा अनिष्ट परिणाम टाळता येतो. केवळ अंधश्रध्देचा भाग न मानता त्यातील शास्त्रीयता पण समजून घेणे योग्य ठरेल.

नियमित व्यायामाचे महत्त्व: कोण किती व्यायाम करतो ह्यापेक्षा किती नियमित पणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वत:च्या लग्नाच्या दिवशी व्यायामाचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून हॉलवर जायला थोडा उशीर करणारे एक गृहस्थ बघण्यात आहेत. जास्त व्यायाम करून शरीर पीळदार दिसते खरे, पण अशा पीळदार शरीरयष्टी वाल्यांची रोगप्रतिकार शक्ती तोळामासाच असते, त्यांची बौध्दिक क्षमता बेताची असते, लहानशा अपघातने हाड मोडल्याची उदाहरणे आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतात. शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्याचे कारण म्हणजे जास्त व्यायामामुळे आहारापासून मिळणारे सर्व पोषक घटक फक्त मांस धातूच्या पोषणासाठी वापरले जातात, परिणामी शरीरातील इतर यंत्रणा कमजोर राहते. थोडा पण नियमित व्यायाम करणारे दिसायला भले पीळदार दिसणार नाहीत, पण अशा पहेलवानां पेक्षा नक्कीच सर्व बाबतीत वरचढ असतात.

बुध्दीचा व्यायाम: नियमित व्यायाम करण्यामुळे शरीराचे स्नायू सुदृढ आणि बलवान होतात तसेच बुध्दीच्या बाबतीत पण समजले पाहिजे. शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवाची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते त्यामुळे ते ते स्नायू बळकट होतात. बुध्दीच्या योग्य विकासासाठी हाच नियम पाळला पाहिजे. समजलेला विषय पुन्हा पुन्हा वाचावा म्हणजे कधीही न विसरण्या इतका पक्का होतो. अभ्यास शब्दाचा खरा अर्थ आहे ‘तीच तीच गोष्ट वारंवार करणे’. सतत काही काळ एका मंद ज्योतीकडे पापण्या न हलवता एकाग्रतेने बघण्याची सवय (त्राटक) करण्याने एकाग्रता (कॉन्सेंट्रेशन) वाढते, चित्त आणि दृष्टी पण सुधारते.
आहारा बद्दल थोडेसे: मनुष्य शरीराची रचना घडवतांना निर्मात्याने फक्त शाकाहाराच्या पचनासाठी योग्य अशी यंत्रणा घडवली आहे. त्यामुळे ज्यांना मांसाहाराची आवड असेल त्यांनी आठवड्यातून एक वेळा पेक्षा जास्त मांसाहार करू नये. आयुर्वेदात पंचखाद्य नावाचा एक चविष्ट पदार्थ वर्णन केला आहे. खारीक, खजूर, खोबरं, खसखस आणि खडीसाखर अशा ‘ख’ ने सुरुवात असलेल्या पाच गोष्टी एकत्र करून झकास चवीचा हा पदार्थ मधल्यासुटी साठी फार आवडीचा मेनू होऊ शकतो. हा नुसता ‘सुका-मेवा’ नव्हे तर खरोखर ‘बौध्दिक-मेवाच’ आहे. वफर्स, वडा-पाव किंवा मैद्याच्या बिस्किटांपेक्षा बौध्दिक-मेवा एक आवडीचा मेनू होईल आणि त्यापासून अनेक फायदे पण होतील. ह्या लिखाणात दिलेल्या सर्व उत्पदनांमधील घटक, संकल्पना व उपचार पध्दती इ. माहीती बद्दल प्रस्थापित शास्त्रीय व वैद्यकीय नियतकालिकांमधून ठोस संदर्भ उपलब्ध मिळतात, ह्यात काल्पनिक किंवा करमणुकीचा भाग किंचितही नाही.

डॉ. संतोष जळूकर:

'एड्स' बद्दल जागरूक व्हा! -उमेश अनपट


hiv

मुळातच एड्स झालेल्या व्यक्तीकडे जेव्हा आपण पहातो तेव्हा नकळत आपल्या डोळयांवर एक नैतिकतेचा चष्मा चढत असतो. त्याचे कारणही तसेच आहे. हा आजार प्रामुख्याने लैंगिक मार्गातून पसरतो. यामुळे आपला आजार सर्वांपुढे येऊ नये असे एड्सच्या रूग्णालाही वाटत असते. समाजाचा दृष्टीकोन आणि रुग्णांची भीती यामुळे एड्स झाल्याचे निदान झाल्यावर सर्वात पहिली प्रतिक्रिया निराशेची, भीतीची आणि रोग लपवण्याची होते. डॉ. एडॉल्फ मेयर या मानसशास्त्रज्ञांचं एक वाक्य एड्सच्या आजाराचे अगदी चोख वर्णन करते. 'मानवी साद- प्रतिसादांच्या अनंत पैलूंनीच एखाद्या आजाराला आजारपण प्राप्त होत असते.'

कोणताही संसर्गजन्य आजार विषाणूंमुळे होतो. या विषाणूंना मारून टाकणारी लस जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यन्त हताशपणे मानवजातीने या आजाराचे 'आजारपण' वाढवत ठेवायचे का? हा खरा प्रश्न आहे. याचे उत्तर नाही आहे. मगं यासाठी आपण या रोगाबद्दलची आपली जागरुकता व माहिती वाढवली पाहिजे. एचआयव्हीची लागण झाल्यावर म्हणजे आपल्या शरीरात विषाणूचा प्रवेश झाल्यावर व्य‍क्ती साधारणपणे पुढील अवस्थांमधून जाते.

१. अवगुंठीत काळ (विंडो पिरिअड) -
संसर्ग झाल्यापासून सरासरी ३ते १२ आठवडे या काळांत मानवी शरीरात विषाणूंचा सामना करण्यासाठी प्रतिप्रथिने (Antibodies) निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असते. म्हणून या काळात शरीरामध्ये एचआयव्ही विषाणू असूनसुद्धा प्रतिप्रथिनांद्वारे होणारी प्रचलित रक्तचाचणी (एलिसा टेस्ट) नकारात्मक होऊ शकते. हा काळ कधी कधी सहा महिन्यांपर्यंत सुद्धा असू शकतो.

२. लक्षणविरहित काळ -
या काळात एचआयव्हीबाधित व्य‍क्तींमध्ये काहीही लक्षणे दिसून येत नाहीत. ‍ही अवस्था ८ ते १० वर्षापर्यंत आढळून येते. काही व्यक्तींमध्ये १२ वर्षे किंवा अधिक असू शकते, तर काहींमध्ये अत्यल्प असू शकते, या काळात रक्ताची एलिसा टेस्ट सकारात्मकच येते.

३. एचआयव्ही - एड्स -
एचआयव्हीबाधित व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती हळूहळू खूप कमी होते आणि रूग्णामध्ये पुढील लक्षणे मुख्यत्वेकरुन दिसतात.

hiv

लक्षणे -
-
वजन कमी होणे- मूळ वजनात १० टक्के किंवा अधिक घट होणे.
-
एक महिन्याहून अधिक काळ खोकला किंवा जुलाब होणे.
-
सतत किंवा अधूनमधून येणारा ताप.

शिवाय वरचेवर न्युमोनिया, फुफ्फुसाचा क्षय, नागीण, कावीळ, अन्ननलिकेला बुरशीमुळे येणारी सूज, कातडीचे आजार, त्वचा कर्करोग असे अनेक आजार होतात. या अशा नव्या जंतुसंसर्गांनी शरीर दुबळे बनते, अनेक रोगांचे जंतू शरीरावर ताबा मिळवतात. या विशिष्ट चिन्हे व लक्षणे असलेल्या अवस्थेलाच 'एड्स' संबोधतात. ही लक्षणे आढळल्यावर योग्य उपचार न झाल्यास, या आजारांमध्ये २ वर्षांच्या आत एड्सच्या रुग्णाचा मृत्यू होतो.

उपाय -
यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे एचआयव्ही होऊ नये म्हणून काळजी घेणे. मुख्य म्हणजे या आजारावर रामबाण औषध अथवा लस उपलब्ध नाही, म्हणून प्रतिबंध हाच उत्तम मार्ग होय. ‍हा आजार बर्‍याच अंशी माणसाच्या जोखीमपूण वागणूकीशी किंवा मानसिकतेशी निगडीत असल्याने तो टाळता येणे सहज शक्य आहे.

रोग टाळण्यासाठी करावयाच्या गोष्टींचे पालन -
अ) एकनिष्ठ जोडीदाराशीच लैंगिक संबंध ठेवावे. एकापेक्षा अनेक व्य‍क्तींशी किंवा अनोळखी व्यक्तींशी शरीरसंबंध टाळावे. संभोगाच्यावेळी निरोधचा (कंडोम) वापर करावा.
ब) अधिकृत रक्तपेढ्यांमधूनच रक्त घ्यावे. निर्जंतुक न केलेल्या सुया व सिंरींजेसचा वापर टाळावा. याबरोबरच इंजेक्शनद्वारे मादक द्रव्यांचे सेवन टाळावे.
क) एचआयव्हीबाधित मातेने गर्भधारणा किंवा गर्भपाताविषयी जबाबदार निर्णय घेण्यास योग्य सल्ला घ्यावा.

रोग परीक्षण चाचणी -
एचआयव्हीची लागण झालेली व्यक्ती बाह्यांगावरुन ओळखू येत नाही म्हणून प्रयोगशाळेत रक्तचाचणी करूनच याचे निदान करता येते। सर्वसाधारणपणे एलिसा टेस्ट व रॅपिड टेस्ट या दोन चाचण्यांनी निदान केले जाते. एचआयव्हीचा संसर्ग झालेली व्यक्ती रोजच्या आयुष्यात आवश्यक ती खबरदारी घेऊ शकते, जेणेकरुन आयुष्याचा कालावधी व दर्जा वाढवू शकेल. एकचआयव्हीची लागण झाल्याचे कळल्यावर त्या व्यक्तींस धक्का बसून राग, दु:ख, चीड, नैराश्य, भीती अशा भावना मनात येऊ शकतात. अशा वेळी त्या व्यक्तीला जवळच्या माणसाच्या आधाराची व मदतीची आवश्यकता असते. स्वत: एचआयव्हीबाधित व्यक्तीने काळजी घेताना. योग्य सकस आहार, व्यायाम, डॉक्टरांचे मार्गदर्शन, सुरक्षित लैगिक जीवन, आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. घरातल्या इतर लोकांनी आपल्या विश्वासाच्या डॉक्टरांकडून एचआयव्ही-एड्सबद्दल शास्त्रीय माहिती करुन घेतली पाहिजे व रूग्णास मानसिक आधार दिला पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरुन त्याचे आयुष्य मानसिक व शारीरिक अशा दोन्ही रीतीने सुसह्य होईल.

hiv

एचआयव्ही-एड्स पसरण्याचे टप्पे -
एखाद्या सांसर्गिक आजाराच्या साथीचा विचार करता तो कसा, किती प्रमाणात पसरतो, त्याचे टप्पे कसे असू शकतात याचा अंदाज करता येतो. एचआयव्ही-एड्सबद्दल हे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

पहिला टप्पा (अत्यंत जोखमीचे समाज घटक) -
अनेकांशी शरीरसंबंध येणारे वेश्याव्यवसायातील स्त्री-पुरूष हे अत्यंत जोखमीचे समाजघटक आहेत. त्यांच्यात या आजाराचे प्रमाण दिसणे हा या साथीच्या आजारातील पहिला टप्पा. अनेकांशी शरीरसंबंध येत असल्यामुळे आजार होण्याचा धोका जास्त असतो.

दुसरा टप्पा (वेश्यागमन करणारे) -
वेश्या-स्त्रीपुरूषांशी शरीरसंबंध ठेवणारे समाजघटक लिंग सांसर्गिक आजाराची लक्षणं घेऊन दवाखान्यात उपचारासाठी येणार्‍या पुरूषांच्या संख्येवरून आजार किती प्रमाणात पसरला आहे ते लक्षात येते. जर ही संख्या वाढत असेल तर सा‍थ दुसर्‍या टप्प्यात आहे असे म्हणता येते.

तिसरा टप्पा (कमी जोखमीचे समाजघटक) -
सर्वसाधारणपणे वेश्यांव्यतिरिक्त इतर स्त्रियांना कमी जोखमीचे समाजघटक समजलं जातं. कारण त्यांचे शरीरसंबंध, विशेषत: विवाहित स्त्रियांचे संबंध सहसा फक्त त्यांच्या पतीशीच येतात. मात्र त्यांनाही हा आजार होणं म्हणजे साथीनं तिसरा टप्पा गाठणं आणि साथीचं सार्वत्रिकीकरण झाले. असं म्हणावं लागतं. गरोदर स्त्रियांच्या तपासणीतून आजार झाल्याचं लक्षात येतं आणि अशा स्त्रियांच प्रमाण वाढूण, ते १ टक्क्यापेक्षा जास्त असणं हे साथ पसरल्याचं निदर्शक आहे.

भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या चार राज्यांत साथीचं सार्वत्रिकीकरण झालेलं आहे. याबरोबरच मणिपूर, नागालॅंड या राज्यातूनही हीच परिस्थिती दिसते. मात्र तिथे शिरेतून मादक द्रव्य घेण्याचं प्रमाण जास्त आहे. प्रामुख्याने येथे एचआयव्ही पसरण्याचे हे प्रमुख कारण दिसून येतं. गुजरात, गोवा ही राज्यही वरील चार राज्यांच्या मार्गावर आहेत.

त्यामानाने उत्तर भारत व केरळमध्ये साथ इतक्या मोठ्या प्रमाणात दिसत नाही. शिवाय कमी प्रमाण असलेल्या राज्यांची वाटचाल जास्त प्रमाणाकडे असं चित्रही कमी प्रमाणात दिसतंय. अर्थात यात केव्हाही बदल होऊ शकतो. त्यामुळे समाधानी रहाण्यात अर्थ नाही. यामुळे सा‍थीला अटकाव आणि नाश करण्यासाठी सदैव सज्जच रहावं लागेल.

आपला देश पुरूषप्रधान संस्कृतीचा असल्यामुळे स्त्रीचे सामाजिक स्थान पुरूषांपेषा कमी महत्वाचे समजले जाते, त्यातून स्त्रियांनी लैगिक विषयावर चर्चा करणे गैर समजले जाते, त्यामुळे या परिस्थितीत ‍स्त्रीला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक या सर्व समस्यांचा सामना करावा लागतो. पुरूष एचआयव्हीबाधित असल्यास त्याला कुटुंबाकडून मानसिक व आर्थिक आधार मिळतो, परंतु त्या तुलनेत स्त्री ला पक्षपात सहन करावा लागतो.

त्यामुळे स्त्रियांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. स्त्री व पुरूष समाजाचे सारखेच महत्त्वाचे घटक आहेत हे लहानपणापासूनच मनावर बिंबवले पाहिजे. जनजागृती केली पाहीजे. स्त्रियांनी या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे.

एड्सचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त -
रोचेस्टर येथील मायो क्लिनिकच्या अभ्यासातून असं दिसून आलंय की, एचआयव्ही बाधित व्यक्तींपैकी स्त्रियांची संख्या फार वेगाने वाढतेय. स्त्रियांना भेडसावणारे एचआयव्हीचे धोके आणि गुंतागुंत पुरुषांपेक्षा वेगळी असते. जीवशास्त्रदृष्ट्याच एचआयव्ही होण्यासाठी त्या अधिक संवेदनशील असतात. विशेषत: वीर्याद्वारे येणार्‍या विषाणूंना योनिमार्गातील नाजुक पेशीसमूहांना गाठणे फारच सोपे असते. एचआचव्हीबाधित स्त्रियांपैकी ७५ टक्के स्त्रियांनी एचआयव्हीबाधित पुरुषाशी शरीरसंबंध केल्यामुळे हा आजार होतो. स्त्री-पुरूषांसाठी एचआयव्हीची प्राथमिक लक्षणे तीच असू शकतात, उदा. बारीक ताप, रात्री घाम येणे, वजन कमी होणे. पणे स्त्रियांना या शिवायही सातत्याने होणारे लिंग-सांसर्गिक आजार, पॉपिलोमा विषाणूमुळे येणार्‍या चामखिळी यामुळे सर्व्हिकल कॅन्सर तसेच ओटीपोटाचा गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. अर्थात जोडीदाराच्या एचआयव्ही स्थितीबद्दलची माहिती आणि कण्डोमचा वापर यामुळै लागण थोपता येऊ शकते. पण स्त्रियांसाठी या आजाराचे निदान लवकरात लवकर होणे आवश्यक असते. कारण त्यामुळै औषधोपचारांचा फायदा निश्चितच होऊ शकतो, शिवाय महत्वाचं म्हणजे आईकडून मुलांना होणारी लागण रोखता येते.

पुरूष, स्त्रियांप्रमाणेच समाजाचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे कुमारवयीन मुले. साधारणत: १२ ते १८ वयोगटातील मुलांचे एचआयव्ही-एड्सची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे या समाजघटकाला लैंगिक शिक्षण देणे, एचआयव्ही-एड्सची शास्त्रीय माहिती देणे खूप गरजेचे आहे. असे झाल्यास आपल्या देशाचे भावी नागरिक या प्राणघातक आजारापासून दूर राहतील. आपली येणारी पिढी दूर राहिल.
स्रोत - वेब दुनिया

आपले योग्य वजन कसे ठरवाल?


आपले वजन किती असावे याची माहिती अनेकांना नसते. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) किंवा याचप्रकारचे मापदंड खरंच कितपत योग्य आहेत? कंबर व नितंबाचा घेर यांच्या प्रमाणावरून आपल्याला योग्य वचन समजू शकते का?

वैद्यकशास्त्रानुसार जास्तीची चरबी शरीराला अपायकारक ठरते. पण दररोजच्या आहारात 'फॅट'चे प्रमाण अजिबात नसणे हे ही 'नर्व्ह सेल्स' चे मंदत्व आणि हार्मोन्सची निर्मिती थांबवते. त्याबरोबरच स्निग्ध पदार्थात विरघळणारे काही व्हिटॅमिन्स शरीरात न विरघळता तसेच शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे दररोजच्या आहारात किती कॅलरीज असाव्यात व त्यामुळे आपले आदर्श वजन कायम राहील? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे. स्वतः:चे योग्य वजन ठरवण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. ज्यात उंची व वजनाच्या गुणोत्तराने योग्य वजन काढता येते. काही पद्धतीत शरीराच्या चरबीच्या स्तराला योग्य मोजता येऊ शकते. या परिस्थितीत आले योग्य वजन 'मसल मांस' किती आहे यावर ठरते.

योग्य वजन म्हणजे काय?
वजनबरोबर असणे याचा अर्थ शरीर ठीक आहे, असा नाही. जवळजवळ सर्वांच्या शरीराचा फिटनेस बदलत असतो. त्यामुळे योग्य वजनाच्या व्याख्येत तुमचे वय, लिंग व उंची या आधारावर तुमचे वजन ठरवले जाते. डॉक्टर वेगळ्या आधारावर तुमच्या जाडेपणाचा निष्कर्ष ठरवतात.

कोणत्याही वयासाठी बीएमआय 18.5 ते 25च्या दरम्यान असल्यास योग्य समजले जाते. जर 30 च्या वर असेल तर वजन जास्त आहे, असे ठरवले जाते. आणि त्याहीपेक्षा जास्त वजन असल्यास त्यास अतिलठ्ठ या सदरात तुम्ही गणले जातात.

वजन कमी करण्यासाठी बीएमआय कायम योग्य असेलच असे नाही। कारण बॉडी बिल्डरांच्या मांसपेशींचे वजन चरबीपेक्षा जास्त असते। त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांचा बीएमआय नेहमी जास्त येत असतो। याचप्रमाणे वयस्करांसाठी 25 ते 27 च्या दरम्यान बीएमआय असणे योग्य आहे. कारण जर तुमचे वय 65 च्यावर आहे. तर हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण मिळेल ते या शरीरावरील अतिरिक्त चरबीमुळेच.


महिलांसाठी योग्य वजन-
आदर्श वजन पुरूष व स्त्री यांत वेगवेगळे असते. तसेच आशियाई व कॉकशियन वंशाच्या स्त्रियांतही फरक आठळतो. पाच फूट उंची असणार्‍या स्त्रीसाठी 45.5 किलोग्रॅम हे आदर्श वजन आहे. जर उंची पाच फुटापेक्षा कमी आहे तर प्रत्येक इंज उंचीवर 2.7 किलोग्रॅम वजन कमी असे मोजावे. आता तुमच्या शरीराची ठेवण छोटी, मध्यम व मोठी आहे का? हे ठरवण्याची सोपी पद्धत म्हणजे तुमच्या मनगटाचे माप जर सहा इंच असेल तर तुमच्या आदर्श वजनात 10 टक्के घट करावी. जर ते माप सहा इंचापेक्षा जास्त असेल तर आदर्श वजनात 10 टक्क्यांनी वाढ करावी.

पुरुषांसाठी योग्य वजन-
पाच फूट उंचीच्या पुरषांचे योग्य वजन 48.2 किग्रॅ असावे. जर मनगटाचे माप सात इंच असेल तर मध्यम ठेवण आहे. जर कमी असेल तर तुमची चण लहान आहे तर योग्य वजनाच्या 10 टक्के वजन कमी समजावे. ते माप सात इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्ही मोठ्या चणीचे आहात व तुमच्या योग्य वजनात 10 टक्के वजन वाढ करावी.

यातही शरीरसौष्ठवपटूंच्या आदर्श वजनात फरक पडू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे वजन कमी करण्याची आवश्यकता सर्वांनाच नसते. तेव्हा शेजारी, मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्या सल्ल्याने वजन कमी करण्याचे उपाय न ऐकता संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्रोत - वेब दुनिया

मधुमेह असतो तरी काय?


मधुमेह म्हणजे काय?
रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजेच मधुमेह. आपण जे अन्न खातो, त्याचे शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ असणार्‍या पॅनक्रियाज् या अवयवातून पाझरणार्‍या इन्शुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींत सामावले जाण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत एकतर इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. हव्या त्या प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. मधुमेहामुळे अंधत्व, हृदयविकार किंवा मूत्राशयाचे विकार उद्‍भवू शकतात.

मधुमेहाची लक्षणे काय?
सातत्याने लघवीची भावना होणे, नेहमी तहान लागल्यासारखे वाटणे, अचानकपणे वजन घटणे, प्रचंड भूक लागणे, दृष्टीमध्ये लक्षणीय बदल, हात किंवा पायांत सतत चमकल्यासारखे किंवा गुदगुल्यांची भावना होणे, बरेचदा थकल्यासारखे वाटणे, त्वचा एकदम कोरडी होणे, जखमा बर्‍या होण्यास वेळ लागणे, नेहमीपेक्षा अधिक वेळा संसर्ग होणे ही मधुमेहाची काही ठळक लक्षणे आहेत. याखेरीज मळमळल्यासारखे वाटणे, उलटीची भावना होणे किंवा पोटात अचानक दुखल्यासारखे वाटणे अशीही लक्षणे जाणवू शकता

.


मधुमेहावर उपचार कोणते?
संतुलित व आरोग्यदायी आहार, शारिरिक व्यायाम आणि इन्शुलिनची इंजेक्शन हे
टाइप-
१ मधुमेहासाठीचे मूलभूत उपचार असतात. घेतल्या जाणार्‍या इन्शुलिनचे प्रमाण हे आहार व विहार या गोष्टींशी संतुलित ठेवण्याची गरज असते. साखरेचे प्रमाणही अगदी बारकाईने तपासत राहिले पाहिजे.

टाइप-२ मधुमेहामध्येही आरोग्यदायी आहार, व्यायाम आणि रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत राहणे या उपचारांची गरज असतेच, शिवाय इन्शुलिन किंवा ओरल मेडिकेशन अथवा दोन्हींच्या एकत्रित उपचारांची गरज असते.

स्वत:ची दैनंदिन काळजी घेणे, त्याचप्रमाणे साखरेचे पातळी फारच खालावणार नाही किंवा प्रमाणापेक्षा वाढणार नाही, याची दक्षताही मधुमेहाच्या रुग्णांनी घेणे अत्यावश्यक असते. त्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांची व्यवस्थित तपासणी करणारा (मॉनिटर) तसेच व्यवस्थित मार्गदर्शन करणार्‍या, शिकविणार्‍या डॉक्टरचा सल्ला व उपचार घेतले पाहिजेत. मधुमेहाच्या दैनंदिन उपचारासाठी ही बाब आवश्यक आहे.

सुयोग्य आहार व व्यायाम यांची जोड मिळाली की, शरीराचा विकास नियोजित आराखड्यानुसार होते. शरीराची ठेवण व विकास मानवामध्ये असलेल्या गुणसूत्रांच्या रचनेतील आराखड्यानुसार होत असते.

स्त्रोत- महान्यूज

कॅन्सर आहे तरी काय?



'कॅन्सर' या रोगाविषयी सामन्य जनतेत प्रचंड भिती पसरली आहे. कॅन्सरवर उपचारच नाही अशी भावना त्यांनी मनात तयार करून घेतली आहे. त्यामुळे कॅन्सरमुळे नाही तर त्याच्या भितीमुळे मोठ्या संख्येने नागरिक दगावतात. आपल्या शरीराचा कुठला एखादा भाग कॅन्सरने व्यापला आहे, असे माहीत असून ही डॉक्टरांना तर दाखवत नाहीच, मात्र ते कुणाशीच त्याविषयी चर्चा करत नाहीत. महिलावर्गात कॅन्सरविषयी खूप भिती असते. त्यांना हा आजार जडला तरी ते त्याची वाच्चाता कुणाकडे करत नाहीत. शरीराच्या एखाद्या भागात गाठ आढळून आल्यास रूग्ण डॉक्टरांकडे जातो, परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कारण कॅन्सर अंतिम टप्प्यात पोहचलेला असतो.

कॅन्सर असतो तरी काय?

शरीरात होणारी गाठ ही कॅन्सरची असू शकते. कॅन्सर हा रोग विविध श्रेणीत विभागण्यात आला आहे. शरीरानुसार या श्रेणी तयार केल्या जातात.

कॅन्सरचे प्रकार-

शरीराच्या हाडात होणार्‍या गाठला बोन ट्यूमर म्हटले जाते. त्यावर उपचार एकच आहे. तो म्हणजे शरीरापासून ते हाड वेगळे करणे होय. पेशींमध्ये होणारा कॅन्सर. यात रेडिएशन देऊन कॅन्सरचा प्रभाव कमी केला जातो. त्याप्रमाणे या व्यतिरिक्त रक्त कॅन्सर हा ही एक कॅन्सरचा प्रकार आहे.

कॅन्सरचे सामान्य लक्षणे-

शरीराच्या कुठल्या भागात गाठ होणे, अचानक शरीर रक्त गोठणे, त्वचेमध्ये परिवर्तन येणे तसेच भूख न लागणे, अधिक खोकला येणे रक्ताच्या उलट्या होणे.

कॅन्सरवर उपचार-

कॅन्सरचे निदान होण्यासाठी सगळ्यात आधी बायोप्सी केली जाते. यात शरीरात झालेल्या गाठमधील मासांचा छोटा तुकडा काढला जातो व त्याचे परीक्षण केले जाते. याला वैदयकीय संज्ञेत बायोप्सी म्हटले जाते. जर गाठ ही लहान असेल तर पूर्ण गाठ काढली जाते. कॅन्सरचे निदान झाल्यावर त्यावर उपचार सुरू करण्यात येतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची व प्रमुख म्हणजे किमोथेरपी होय.

किमोथेरपीच्या माध्यामातून कॅन्सरचा प्रभाव कमी केला जातो. उदाहरण द्याचे झाल्यास जर कॅन्सर चौथ्या स्टेजवर असेल तर ही थेरेपी त्याला दूसर्‍या स्टेजवर आणला जातो. प्रत्येक कॅन्सरवर किमोथेरपी दिली जात नाही. तर रेडियोथेरपीच्या माध्यमातून शरीरात निर्माण झालेल्या कॅन्सरच्या गाठ कमी करण्याचे काम केले जाते.

बहुगुणी आवळा


बहुगुणी आवळा


आवळा हे फळ आहे तसेच औषधही आहे. आयुर्वेदामध्ये बहुगुणी आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. साधारण हिवाळ्यात येणारे फळ आहे. हिवाळ्याच्या प्रारंभी म्हणजे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये येणारा लहान आकारातील आवळा हा रसपूर्ण नसल्याने त्याचा वीर्य वाढीच्या दृष्टीने पाहिजे तसा नसल्याने फायदा होत नाही. परंतु डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो व त्यात शक्तीवर्धक रसायने समाविष्ठ होत असतात. आवळा हे फळ आपल्याला वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरब्बा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापर करू शकतो.

'
सी' व्हिटॅमिनने पूर्ण-
आधुनिक रासायनिक विश्लेशषाच्या आधारे आवळा या फळात जितके 'सी' व्हिटॅमिन आढळते तितके कुठल्या अन्य फळात आढळत नाही. बेलफळाच्या दहा टक्के संत्र्यात व संत्र्यांच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त 'सी' व्हिटॅमिन आढळते.

त्रिदोषनाशक-
आवळा तूरट-आंबट असल्याने पित्त, कफ व जुलाब या आजारावर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशक ही म्हटले जाते.

आवळ्याचे अन्य गुण-
आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.

घरचा वैद्य

पांढरेकेस काळे करणे
mehandi


100 ग्रॅम मेंदीची पावडर, 100 ग्रॅम आवळ्याचे चूर्ण आणि 250 ग्रॅम चहापत्तीचे पाणी घेऊन लोखंडाच्या कढईत तीन दिवस ठेवून द्यावे. यानंतर यात गरजेनुसार पाणी मिसळून केसांत लावावे. दर 15 दिवसांनी हा प्रयोग केल्याने केस अगोदर तांबूस हेऊन नंतर नैसर्गिक रित्या काळे




टक्कल पडणे

hair


1. 2-3 लसण्याच्या पाकळ्या डोळ्याला लावायच्या सुरम्या बरोबर खरळीत वाटाव्या. या चटणीला टक्कल पडलेल्या भागावर लावावे. जळजळ झाली तर अगोदर तूप किंवा लोणी लावून मग त्यावर हा लेप लावावा. 20-30 दिवस हा लेप दररोज करावा.

2.
दिवसातून 2-3 वेळा कोथिंबिरीच्या रसाचा मसाज केल्याने काही दिवसातच फायदा होतो.

केस गळणे

beauty


1. सकाळी वाळलेला आवळा पाण्यात भिजवून ठेवावा. रात्री झोपताना आवळा वाटून केसांत लावून लेप करावा. एक तासाने कापडाने पुसून घ्यावे. सकाळी स्नान करताना धुऊन घ्यावे.

2.
केस धुताना साबण किंवा शॅंपू वापरू नये. शेतातली स्वच्छ माती घेऊन त्याने केस धुवावे. माती उपयोग करण्यापूर्वी 15-20 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावी. चांगली चोळून गाळून घ्यावी व त्या पाण्याने केस धुवावे.

सौंदर्य उपचार

beauty


1. चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या मुळे डाग पडल्यास बटाटे उकडून थंड करावे आणि सालासकट वाटून घ्यावेत. त्या काकडीचा रस टाकून थोडा सा लिंबाचा रस मिसळावा या मिश्रणाने चेहऱ्यावर लेप करावा. तासा भराने धुऊन टाकावा काही दिवस प्रयोग केल्याने डाग नाहीसे होतील.

2.
चेहऱ्यावर ची काळसर झाक दूर करण्यासाठी एक चमचा व्हिनीगर मध्ये अंड्याचा पांढरा बलक आणि पिकलेले केळे चांगल्याप्रकारे मिसळावे या पेस्टला चेहऱ्यावर 15 मिनिटं लावून ठेवावे नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावे. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करावा.

3.
पिकलेले पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर रगडावा. दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा. थोड्याच दिवसात चेहरा उजळून चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या इत्यादी नाहीश्या होतील.

रात्री झोप न लागणे (निद्रानाश)
कपभर दूधात थोडे जायफळ उगाळून त्यात साखर घालून हे दूध रोज रात्री प्यावे। डोक्यावर तिळाचे तेल थापावे झोप शांत लागते॥ एरंडाचे पान डोक्याला बांधून झोपावे.


आयुष्याची शतकपूर्ती करायची असल्यास(लेख) - कॅ. पुरुष बावकर


विसाव्या शतकात मानवी शरीरास त्रास देणाऱया अनेक रोगांवर उपचारांसाठी नवनवीन औषधे शोधण्यात आली आहेत. अनेक भेडसावणाऱया रोगांवर, उपाय करण्यासाठी संशोधन होऊन औषधे सापडली आहेत. त्याचा परिणाम म्हणजे, मनुष्याचे वयोमान वाढले आहे. तो आता जास्त काळ जगू शकतो. पण सर्रासपणे शतकपूर्ती करणारे फार फार कमी आहेत. माणसाचे वयोमान हे औषधांवर अवलंबून नसून त्याच्या लाईफ स्टाईल वर अवलंबून असते. औषधांनी रोग समूळ नष्ट होत नाही. फक्त काही काळापुरते त्याचे वयोमान वाढते. पूर्वी सरासरी वयोमान साठ-बासष्ट असायचे. पण आता ते साधारणपणे पंचाहत्तरपर्यंत वाढले आहे. तरीही पण सर्वसाधारणपणे कुणीही शतकपूर्ती करू शकत नाही. मनुष्याने आपली लाईफ स्टाईल आणि आधुनिक औषधे यांचा समन्वय साधला तर तो सहजच शतकपूर्ती करू शकतो. पण त्यासाठी औषधांपेक्षा आपल्या लाईफ स्टाईलवर जास्त ध्यान देणे आवश्यक आहे.

इंग्रजी भाषेत `हेल्थ' असा शब्द आहे. त्याला पर्याय म्हणून मराठी भाषेत आपण आरोग्य हा शब्द वापरतो. `हेल्थ' पासून हेल्दी हा शब्द होतो. हेल्दी माणूस म्हणजे निरोगी माणूस. माणूस निरोगी असेल, त्याचे आरोग्य चांगले असेल तर तो साहजिकच जास्त काळ जगतो. काहीवेळा दणदणीत प्रकृतीचा माणूस पहिल्याच हार्टअटॅकने मृत्यू पावतो. प्रकृती दणदणीत दिसली म्हणजे तो निरोगी आहे असे समजायचे कारण नाही. रक्तदाब हा असा विकार आहे की तो बाहेरून दिसत नाही. हा `रक्तदाब' मनुष्याच्या लाईफ स्टाईलकर अवलंबून असतो. अनेक वेळा तो समजत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा, वरवरून दणकट दिसणारा मनुष्य निरोगी असतोच असे नाही. माणूस निरोगी राहण्यासाठी त्याच्या आहारावर बंधन असायला हवे. त्याने योग्य आहार घेतला पाहिजे.
medium_all fruitBig_0.jpg

आपल्या देशातील अनेकांचे, म्हणावे तसे आरोग्य चांगले नाही. कारण त्यांचा आहार. ते जो आहार करतात तो आरोग्यदायक नसतो. त्यामुळे त्यांना कॅन्सर, मधुमेह यांसारखे रोग होतात. ते सहजासहजी बरे होत नाहीत. तीस वर्षांपूर्वी, आपल्या देशात जितके कॅन्सरचे रोगी होते, त्याहून आज जास्त आहेत. कॅन्सर निरनिराळ्या प्रकारचा असतो. त्याचप्रमाणे मधुमेह. खेड्यापेक्षा शहरात आणि ते सुद्धा मुंबईसारख्या धावपळीचे जीवन असलेल्या शहरात मधुमेह झालेल्या रोग्यांचे प्रमाण जास्त आहे. आपल्या देशातील अर्धीअधिक जनता कसल्या ना कसल्या रोगाने पीडीत आहे आणि औषधी गोळ्या खात असते. हे प्रमाण सुधारणे आवश्यक आहे आणि ते सुधारायला आरोग्य चांगले राखायला हवे.

निरोगी आरोग्य राखण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आपण घेत असलेले अन्न. हे अन्न कसे असायला हवे? ताज्या पालेभाज्या, हिरव्या पानांची चटणी किंवा सालाड. चांगले आरोग्य राखण्यासाठी तुमची न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, या तीन वेळा तुमच्या पोटात जाणारे अन्न आरोग्यदायक असायला हवे. अन्न आणि आहार हे दोन शब्द अनेकवेळा एकाच अर्थाने वापरले जातात. पण ते योग्य नाही. अन्न हे आपण जे जेवण्यासाठी दुपार-रात्री खातो त्याला अन्न म्हणायला हवे. उदा. भात, भाजी, आमटी, पोळ्या वगैरे आहार. उदा. सकाळी किंवा लंच आणि डिनर याच्या मधल्या वेळी घेतो. अन्न आणि आहार हे अर्थात दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत. आहाराला इंग्रजीत न्युट्रिशन म्हणतात. यामुळे शरीराचे योग्य पोषण होते. शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

medium_Steamboat-Ingredients1.jpg
बॅलन्स डायेट म्हणजे समतोल आहार. हा जो समतोल आहार आहे, त्यात आपल्या शरीराला योग्य काय आहे हे पाहणेही फार महत्त्वाचे आहे. या समतोल पण पोषक आहारात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायटोकेमिकल्स, फॅटिऍसिड, प्रोटिन्स आणि फायबर या सर्वांची शरीराला जरुरी असते. त्यामुळे आपले हृदय स्ट्राँग म्हणजे मजबूत बनते, धष्टपुष्ट होते. पण फॅट आणि सॉल्ट याने शरीराला हानी पोचते. हृदयाला तर पोचतेच पोचते. रक्तदाब (ब्लडप्रेशर) हायपर टेन्शन आणि इतर रक्तवाहिन्यासंबंधित रोग होतात.
वर केलेल्या विवेचनावरून आपल्याला समतोल आणि पौष्टिक आहाराची-अन्नाची गरज आहे हे समजलेच असेल. नुसता समतोल आहार आणि व्यायाम घेऊन तुम्ही तुमचे शरीर सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न जरी करत राहिला तरी आपल्या शरीराकडे लक्षपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे. कारण तुमच्या डायेटमुळे समतोल आहार घेऊनही आपले वजन, आपल्या उंचीला योग्य-त्या प्रमाणात आहे की नाही हे पाहणे फार महत्त्वाचे आहे.
माणसाचे वजन वाढल्यामुळे, लठ्ठपणा आल्यामुळे, रक्तदाब, श्वासोच्छवास, हार्टअटॅक, आथ्रायटीस, गालब्लाडर, झोपेतले ब्रीदिंग, ऍस्टोआथ्रायटीस, कॅन्सर, दुसऱया टाईपचा मधुमेह अशा प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. तेव्हा आपला `बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) पाहून त्याप्रमाणे शरीराचे वजन राखण्याची काळजी घ्यावी. पुरुषाचा बीएमआय तीसच्यावर असल्यास लठ्ठपणा आहे असे समजावे. त्याचप्रमाणे स्त्राrचा बीएमआय पंचवीस ते एकोणतीस असल्यास ती लठ्ठ आहे असे समजावे(ओबेस) . त्याप्रमाणे काळजी घ्यावी. माझ्या माहितीप्रमाणे `बी एम आय' म्हणजे शरीरातील चरबी. खरे तर अठरा वर्षांवरील स्त्राr किंवा पुरुष यांचा बीएमआय पंचवीसच्या वर गेला तर तो धोकादायक असतो. `बीएमआय' जसा वाढत जातो तसा धोकाही वाढत जातो.
योग्य आहार कोणता-
1) फळे, पालेभाज्या-वनस्पती, फॅट नसलेले दूध आणि प्रक्रिया न केलेले कडधान्य इ.
2) मासे, दाणे आणि वनस्पती तेल यांमधून 20-25 कॅलरीपर्यंत.
3) फायबर-कोंडायुक्त धान्य.
4) 2000 कॅलरी असण्यासाठी दोन वाट्या भाज्या; यात फळे पण असावी.
5) साखरेचे प्रमाण अत्यल्प.
6) सोडियम किंवा मीठ असलेला आहार वर्ज्य. वरील सर्व आहार घेत असताना आपला `बीएमआय' हेल्दि (निरोगी) रेंजमध्ये आहे की नाही हे पडताळून पाहणे.
तुमच्या शरीराला समतोल आहार मिळण्यासाठी पौष्टिक गुणयुक्त अन्नपदार्थांची जरूरी आहे.
फळे ः- शरीराला निरनिराळ्या फळांची गरज असते. कारण त्यात व्हिटॅमिन्स असतात. यांत ताजी, डब्यात पॅक केलेली किंवा सुकी फळे(सुकामेवा) चालतील. फळांचा रस घेण्यापेक्षा, फळे उत्तम. शरीराला 2000 कॅलरी मिळवण्यासाठी एक केळे, एक मोठे ऑरेंज आणि पाव कप सुकी ऍप्रिकॉट किंवा पीच. नोनी फळांच्या रसामध्ये सुदृढ शरीराला आणि मनासाठी आवश्यक गुणधर्म आहेत. वरील गोष्टींच्या ऐवजी हा रस प्यायला हरकत नाही. यात भरपूर फायटोकेमिकल्स आहेत.
पालेभाज्या ः- सर्व तऱहेच्या हिरव्या पालेभाज्या, गाजर, रताळी, बीन्स, लेन्टिन वगैरे ज्यात जास्तीत जास्त फायटोकेमिकल्स, न्यूट्रस्युटिकल्स आहेत. बीन्समध्ये किडनी बीन्स, पिंटो बीन्स, ब्लॅक बीन्स, गारवान्झो बीन्स. यांत जास्तीत जास्त फायटो केमिकल्स आणि न्यूट्रस्युटिकल्स आहेत. या बीन्समुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. नोनी फळाच्या रसात जास्तीत जास्त फायटोकेमिकल्स आहेत.
अन्नधान्य ः- दररोज साधारणपणे 3 औंस, पॉलिश न केलेले अन्नधान्य आपल्या पोटात जाणे आवश्यक आहे. उदा. ब्रेडचा एक स्लाईस एक औंसाचा असतो. साध्या ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड वापरणे चांगले. तसेच अर्धा कप भात,गव्हाचा रवा, तांदूळ (पॉलिश न केलेला - ब्राऊन राईस) ओट किंवा कॉर्न याला इंग्रजीत `व्होक' असे म्हणतात.
समतोल आहार म्हणजे `ऍक्टिव' आणि हेल्दी लाईफ स्टाईलची चावी आहे. तुमच्या पोटात जाणाऱया न्यूट्रिशन आणि व्हिटॅमिन्स असलेल्या अन्नामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.
आपल्याला जीवन जगायचे असेल तर खाणे महत्त्वाचे आहे हे सांगायची आवश्यकता नाही. पण तुम्ही जे खाता त्यावरच तुमचे चांगले. वाईट आरोग्य अवलंबून असते. ज्या अन्नात पौष्टिकता असते अशाच अन्नामुळे आपल्या शरीरात ताकद निर्माण होते. आपल्या शरीराची उत्तम वाढ होण्यासाठी, शरीरसौष्ठवासाठी पौष्टिक अन्नाची आवश्यकता असते. शरीराला आवश्यक असणाऱया पौष्टिक अन्नाचे चार भाग केले आहेत. आपला आहार कसा समतोल राहावा, यासाठी या चार भागांची माहिती करून घ्यायला हवी. त्यासाठी आपल्या शरीराला हवे असणारे मुख्य पौष्टिक पदार्थ कोणते हे पाहू .
आपल्या शरीराला प्रोटिन्सची फार गरज असते. मटण, मासे, अंडी यांत भरपूर प्रोटिन्स आहेत. प्रोटिन्समुळे रक्तामध्ये नव्या पेशी निर्माण होण्यास मदत होते.
कार्बोहायड्रेट आणि फॅट यांची निरोगी चांगले शरीर ठेवण्यास मदत होते. अनेक फळांमध्ये कार्बोहायड्रेटस् आणि फॅट असते. सिरिअल्समध्येही फॅट सापडते. पण एक मात्र लक्षात ठेवावे, शरीरात जास्त फॅट गेल्याने लठ्ठपणा येतो आणि हृदयविकार होण्याची शक्यता असते.
बरीचशी माणसे व्हिटॅमिनच्या गोळ्या खातात. पण आपल्या नेहमीच्या अन्नामधूनही बरीच व्हिटॅमिन्स मिळतात. व्हिटॅमिन्समुळे शरीराची वाढ होण्यास मदत होते आणि आरोग्य चांगले राहते. व्हिटॅमिन हा शब्द 1900 साली वापरात आला. व्हिटॅमिनमध्ये नायट्रोजन आहे असे समजून त्या शब्दाचे स्पेलिंग 'viatmine' असे करण्यात आले. पण पुढे असे दिसून आले की सगळ्याच व्हिटॅमिन्समध्ये नायट्रोजन नसते त्यामुळे त्या शब्दातील 'e' काढण्यात आला, आणि त्याचे स्पेलिंग 'vitamin' असे ठेवण्यात आले. आपण घेत असलेल्या अन्नामध्ये अनेक प्रकारची व्हिटॅमिन असतात. पण अन्न शिजवल्यानंतर ती नाहिशी होतात. तेव्हा बाहेरून गोळ्यांमार्फत व्हिटॅमिन घेणे जरुरी असते. त्यामुळे शरीरात समतोलपणा राहतो. अन्नामध्ये सापडणारी व्हिटॅमिन्स पुढे दिली आहेत
व्हिटॅमिन ए ः-
रताळी, गाजर, खरबूज, कलिंगड आणि पालेभाज्या यांत ए व्हिटॅमिन सापडते. `ए' व्हिटॅमिन डोळे आणि शरीराच्या कातडीसाठी फार उपयोगी आहे. त्याची शरीराला जरुरी आहे. नोनी फळाच्या रसात भरपूर, ए व्हिटॅमिन सापडते.
व्हिटॅमिन सी ः-
व्हिटॅमिन `सी' चा उपयोग सर्दी पडसे आणि सहजासहजी येणारा ताप बरा करण्यासाठी होतो. ऑरेंज, लिंबू, तसेच काही पालेभाज्या, ब्रोकोली या मध्ये `सी' व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. शरीरात व्हिटॅमिन `सी' जास्त असल्यास सर्दी होत नाही. जरूर पडेल तेव्हा गोळ्यांमार्फत ते घ्यावे. व्हिटॅमिन सी मुळे हाडे मजबूत होतात. आणि रक्तपेशींची चांगली वाढ होते. नोनीच्या रसात `सी' व्हिटॅमिनचे प्रमाण भरपूर आहे आणि त्यामुळे अस्थमा, सुका खोकला कायमचा नाहिसा होतो.
व्हिटॅमिन डी ः-
दूध,अंडी आणि खाऱया पाण्यातील माशांमध्ये डी व्हिटॅमिन सापडते. डी व्हिटॅमिनमुळे हाडे आणि दात घट्ट होतात. सूर्यप्रकाशातही व्हिटॅमिन `डी' सापडते.
थायमिन आणि निआसिन ः-
या व्हिटॅमिन्समुळे अन्न पचायला मदत होते. या व्हिटॅमिन्समुळे आपली नर्व्हस् सिस्टिम सुधारते. अंडी, लिव्हर, मटण आणि `पीज्' मध्ये हे सापडतात.
मिनरल्स ः-
`िमनरल्स' हा खनीज पदार्थ आहे याची शरीराला फार गरज आहे. यामुळे शरीरातील प्रत्येक अवयव उत्तम स्थितीत राहून हालचालीला मदत होते. कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न आणि सोडियम ही महत्त्वाची मिनरल्स आहेत. कॅल्शियमुळे, दात आणि हाडांची चांगली वाढ होते. मजबुती येते. तसेच, हृदय आणि स्नायूना बळकटी येते. दूध, दही आणि नोनी फळाच्या रसात भरपूर कॅल्शियम सापडते.
आयर्न ः-
बीन्स, सुका मेवा व काही भाज्यांमध्ये आयर्न सापडते. आयर्नमुळे रक्ताद्वारे ऑक्सिजन पेशींपर्यंत पोचतो.
पोटॅशियम आणि सोडियम ः-
पोटॅशियम आणि सोडियममुळे स्नायूंच्या हालचालीला मदत होते. सिरिअल्स, मीठ आणि काही भाज्यांमध्ये पोटॅशियम-सोडियम असतो. नोनी फळाच्या रसात पोटॅशियम आणि सोडियम भरपूर प्रमाणात आहे.
पोषक पदार्थ (न्यूट्रिशन्ट) कोणते, ज्याची आपल्या शरीराला आवश्यकता आहे. हे समजून घेऊन त्याप्रमाणे अन्न ग्रहण करायला हवे. सर्व अन्नपदार्थ चार विभागांत वाटले आहेत. प्रत्येक विभागात निरनिराळे पोषक पदार्थ आहेत. या चार विभागातील योग्य अन्न आपण ग्रहण करायला हवे.
हे चार विभाग कोणते?
1) दूध आणि इतर डेअरी पदार्थ,
2) मांसजन्य पदार्थ,
3) ब्रेड आणि धान्य (सिरिअल) पदार्थ,
4) फळभाज्या.
या प्रत्येक विभागातील अन्न प्रत्येकाने, योग्य पोषक द्रव्ये मिळण्यासाठी खाणे आवश्यक आहे. त्याचे प्रमाण आपणच ठरवायचे. पण समतोलपणा राखण्याचा प्रयत्न करावा.
वरील सर्व पदार्थांतून थोड्याफार प्रमाणात पाणी पोटात गेले तरी ते पुरेसे नाही. तेव्हा पाण्याची गरज सर्व अन्न पचवण्यासाठी आहे. पाण्यामुळे उज्जेत (हायड्रेट) निर्माण होऊन रक्ताचा शरीरात प्रसार होतो आणि अन्न पचते. प्रत्येकाने, प्रत्येक दिवशी कमीतकमी दहा ग्लास किंवा तीन मोठ्या बाटल्या पाणी प्यायलाच हवे. (तीन लिटर).
दैनिक जीवनासाठी 10 नियम -
1) मनन आणि व्यायाम, 2) योग्य समतोल प्रमाणात खाणे, 3) शाकाहारी होणे 4) लिटर पाणी पिणे, 5) झोपण्यापूर्वी तीन तास अगोदर जेवणे, 6) आपल्या बोलण्यावर संयम ठेवणे, 7) प्रेमपूर्वक वागणूक ठेवणे, 8) पृथ्वीमातेची सर्व प्रकारे देखभाल ठेवणे, 9) कृतज्ञापूर्वक जीवन जगणे, 10) तणावावर काबू ठेवणे.
(`आयुष्याची शतकपूर्ती करायची असल्यास' या माझ्या पुस्तकातील काही भाग वर दिला आहे. हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होईल - लेखक).
--- कॅ. पुरुष बावकर

वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स... : - डॉ. नीता जळूकर

आयुर्वेदिक म्हटल्याबरोबर आपल्या मनात आलं असेल परिणाम हळू होत असला तरी साईड इफेक्ट नसतात''. आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्यविषयक मूलभूत सिद्धांत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्याविषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्त्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेदविलयन करून तो शरीराबाहेर काढणे. ह्याला मेदनाशक (थर्मोजेनिक) औषधांचा (उष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. उष्णतेमुळे सहज वितळतो. अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खालणs जाते. पित्तशमनाच्या 2 टेंबलेट्स जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो. भूक सौम्य होते. शिवाय उष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या उष्ण गुणांपासून आतड्यांच्या नाजुक आवरणाचे सरंक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमनच्या 2 गोळ्या जेवणाच्या आधी अर्धा तास घ्याव्यात व मेदनाशकच्या 2 गोळ्या जेवणानंतर 2 तासांच्या आत घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहीत असते. आयुर्वेदानुसार आरोग्यविषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टीं अमलात आणल्dया तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिद्ध झालेल्या आहेत.
1) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वत करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. 1-2 दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नेहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जेवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्राrय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करु नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
2) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्त्वे वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
3) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. उष्णतेमुळे सहज वितळतो. अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्डड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा.
4) वजनाच्या नियंत्रणासाठी पाणी पिण्यासंबंधी आणखीन काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. जेवणानंतर पाणी पिऊ नये, तर जेवणात मधेमधे थोड्या वेळाने पाणी पीत जावे. जास्त पाणी आरोग्यासाठी योग्य नाही. जेवणानंतर आचमन करण्याची प्रथा म्हणजेच जास्त पाणी पिण्याचा शास्त्राने सुचविलेला निषेध आहे असे समजावे. जेवणानंतर जास्त पाणी पिण्यामुळे पाचक स्राव मंद होतात, अन्नपचन बरोबर होत नाही व परिणामी मेद वाढू लागतो.
5) चहा-कॉफीसारखी साखरयुक्त पेये दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा-घोटाबरोबर पोटात जाणारी साखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
6) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते. ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजनवाढीला व एकंदरीत रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
7) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.
8) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रुपांतर चरबीत हेते.
9) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्यशरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जास्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
10) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की `दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाणवल्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.
11) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्यासाठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहुर्ताची वाट बघू नये. सवय मोडताना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
12) जेवण झाल्यानंतर `आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको' हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर 10 ते 15 मिनिटे थांबून मग स्वतलाच प्रश्न विचारावा, ``अजून खरोखर भूक आहे का?'' जर उत्तर `नाही' मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून `बस्स' करा.
13) जास्त जेवण घेण्याची सवय चरबी काढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.
14) `भात खाण्यामुळे वजन वाढते' असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे, पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो.
15) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्याविषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात `थोड्या- थोड्या वेळाने थोडा-थोडा आहार घ्यावा' तर कोणाच्या मते `ठराविक वेळी पोटभर जेवावे'. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी `आयुर्वेदाची शिकवण योग्य' असेच मानावे. आयुर्वेदात `याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्' असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः- `चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.'

- डॉ. नीता जळूकर

शनिवार, २ मे, २००९

सामान्य रोग - http://www.indg.in/


बाल आरोग्य - http://www.indg.in/

बाल आरोग्य

महिलांचे आरोग्य- http://www.indg.in/

महिलांचे आरोग्य


by krishnapriya अंतिम सुधारित April 21, 2009 07:35 PM

पौगंडावस्थेतील आरोग्य

गर्भावस्थेमधील आरोग्य

पुनरुत्पादक आरोग्य