मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९

टॅमिफ्लूचे अनावश्‍यक सेवन टाळा!

देशभरात विशेषत: महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचा कहर वाढला आहे. रोग नवा असल्याने आणि बहुतांश जणांना याबाबत माहिती नसल्याने अनावश्‍यक उपचारांकडे लोकांचा कल असण्याची शक्‍यता आहे. या नव्या रोगाबद्दल योग्य माहिती घेउन त्यावर उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा यातून नव्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्‍यता अधिक आहे.
स्वाइन फ्लूची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी सरसकट टॅमिफ्लू या प्रतिजैविकाचा वापर करण्याचा सल्ला सर्वच यंत्रणांकडून देण्यात येत आहे. मात्र, जपानी संशोधकांच्या मते लहान मुलांना टॅमिफ्लू देणे अत्यंत हानीकारक असून, भविष्यात या औषधाचे दुष्परिणाम म्हणून मुलांमध्ये मानसिक समस्या निर्माण होण्याची शक्‍यता अधिक आहे.
जपानी संशोधकांनी केलेल्या संशोधनातही ही बाब उघड झाली असून, टॅमिफ्लूचे सेवन केलेल्या अनुक्रमे १२ आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलांनी उडी मारल्यानंतर त्यांचे पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सिद्ध झाले आहे. ही झाली सन २००६-०७ ची गोष्ट. ही माहिती न्यूसायंटिस्ट डॉट कॉम या वेबसाईटवर आहे. त्यानंतर, बसेलस्थित (स्वित्झर्लंड) रोश होल्डिंग या टॅमिफ्लूची निर्मिती करणाऱ्या जगातील एकमेव कंपनीकडून करण्यात आलेल्या खुलाश्‍यात या औषधाचे सेवन करणाऱ्यांमध्ये मानसिक आजारांची लक्षणे कमी प्रमाणात आढळल्याचा दावा करण्यात आला. फ्लू हा मुळातच मेंदू आणि मानसिक आजारांशी संबंधित विकार आहे. त्यामूळे या रोगाचे विषाणू थेट मेंदूवरच आघात करतात. मात्र टॅमिफ्लूच्या वापराने त्या विषाणूंची संख्या नियंत्रित करणे अथवा नष्ट करणे सहज शक्‍य असल्याचे मत रोशच्या टॅमिफ्लू निर्मिती विभागाचे तत्कालीन प्रमुख डेव्हिड रेड्डी यांनी व्यक्त केले होते. मात्र, २००७ मधील जपान सरकारच्या आकडेवारीनुसार टॅमिफ्लूच्या सेवनाने ५४ लोकांना जीव गमवावा लागला होता, असेही या वेबसाईटवर म्हटले आहे.
जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्‍शियस डिसीजेसचे प्रमुख संशोधक मासातो ताशिरो यांच्या मते टॅमिफ्लूच्या सेवनाने मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, तैवान आणि काही युरोपीय देशांमध्ये टॅमिफ्लूच्या वापरावर स्पष्ट निर्बंध घालण्यात आले आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये टॅमिफ्लू आणि रेलेंझा या प्रतिजैविकांमुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखता येतो, मात्र, त्याचे दुष्परिणामही थांबवता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाला असेल तरच, टॅमिफ्लूचे सेवन करणे आवश्‍यक आहे. अनावश्‍यक भीतीपोटी किंवा कोणाच्याही दबावात न येता वैद्यकीय सल्ल्यानेच या प्रतिजैवकाची योग्य मात्रा घेणे आवश्‍यक ठरणार आहे. ई सकाळच्या एका जागरुक वाचकाने पाठविलेल्या इंग्लंडमधील डेली मेल दैनिकातील बातमीनुसार, तेथील वैद्यकीय तज्ञांनी लहान मुलांकरीता टॅमिफ्लूचे सेवन घातक असल्याने ते टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते टॅमिफ्लू या प्रतिजैविकामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव अत्यंत अल्प प्रमाणात रोखता येतो, हे जरी खरे असले तरी त्यामुळे मुलांच्या शरीरात अत्यंत जटील समस्या निर्माण होतात हेदेखील विदारक सत्य आहे. टॅमिफ्लूच्या सेवनाचा लहान मुलांच्या शरीरावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी प्रदीर्घ संशोधन करण्यात आले आहे. त्यातून वरील निष्कर्ष काढण्यात आले आहेत. याचा अर्थ मुळीच असा नाही की लहान मुलांना स्वाइन फ्लू झाला असता टॅमिफ्लू देउ नये, या लेखाचे तात्पर्य एवढेच की केवळ संशयपिशाच्चामुळे सरसकट ही गोळी न देता ती डॉक्‍टरांच्या सल्ल्याने द्यावी. इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या निरीक्षणांमध्ये टॅमिफ्लूच्या अतिरेकी सेवनामुळे लहान मुलांमध्ये सतत उलटी येणे, अस्वस्थ वाटणे आणि स्वप्नदोष या विकारांची लक्षणे दिसून आली आहेत. ऑक्‍सफोर्ड विद्यापीटातील अभ्यासक डॉ. मॅथ्यू थॉम्प्सन आणि डॉ. कार्ल हेनेगन यांच्या मते टॅमिफ्लू हे प्रतिजैविक म्हणजे स्वाइन फ्लूवरील वरदान आहे, असे मुळीच नाही. त्यांनी केलेल्या चार संशोधनांत स्वाइन फ्लू झालेल्या मुलांनी सतत घेतलेली विश्रांती आणि योग्य औषधोपचारामुळे ते इतरांच्या तुलनेत लवकर आजारमुक्त झाले.
http://beta.esakal.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा