मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

गुरुवार, १३ ऑगस्ट, २००९

बनावट दूध नेमके काय असते?

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बनावट दूधाचे साठे आणि त्यासाठी लागणारे रसायने पकडण्यात आले आहे. केवळ पैशांसाठी हे दूधमाफिया लोक एकप्रकारे लोकांच्या आयुष्याशीच खेळत आहेत.
खेड्यांमध्येच या बनावट दूधाचे साठे सापडण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच गावांमध्ये सहकारी दूध उत्पादक संघांच्या माध्यमातून दूध संकलनाचे काम चालते. दूध संकलन करताना लॅक्‍टोमीटरच्या साह्याने दूधातील फॅट तपासले जाते. त्यानुसारच या दूधाचा दर्जा ठरविला जातो आणि ते विकत घेतले जाते.
मात्र ही तपासणी केवळ फॅट तपासण्यापुरतीच मर्यादित राहते. याव्यतिरिक्त इतर चाचण्या अशा दूध केंद्रांवर सहसा केल्या जात नाहीत. त्याचाच फायदा हे बनावट दूधमाफिया घेतात. त्यांचे हे बनावट दूध या फॅट चाचणीला पूरेपूर उतरते आणि कुणाच्याही नकळत चांगल्या दूधात मिसळले जाते. त्यातूनच मग सर्वसामान्य ग्राहकांच्या जीवाशी एक जीवघेणा खेळ सुरू होतो. हे बनावट दूध नक्की कसे तयार होते. त्याच्या चाचण्या कशा कराव्यात हे समजले तर आपणही नक्कीच त्याच्या दुष्परिणामापासून वाचू शकतो.

सिंथेटिक किंवा बनावट दूध हे गाई किंवा म्हशीच्या नैसर्गिक दूधासारखेच दिसत असले तरी ते काही खरे दूध नव्हे. नेहमीच्या दूधाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात इतर कृत्रिम पदार्थांची भेसळ केली जाते. अशा कृत्रिम पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या दुधालाच सिंथेटिक किंवा रासायनिक दूध असेही म्हणतात. यात मुख्यत: पाणी, अतिशय बारीक केलेली डिटर्जंट पावडर किंवा साबण, सोडियम हायड्रॉक्‍साइड, खाद्यतेल, मीठ आणि युरिया यांच्या मिश्रणाचा बनावट दूधात उपयोग केला जातो.

अशा पद्धतीचे दूध तयार करण्यासाठी एका मोठ्या तोंडाच्या भांड्यामध्ये कुठल्याही प्रकारचे खाद्यतेल घेतले जाते. ते पाण्यात अशा पद्धतीने मिसळतात की त्यापासून दूधासारखे घट्ट पांढरे मिश्रण तयार होईल. तेल आणि पाणी यांचे मिश्रण होण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या रसायनाचा वापर केला जातो. एकदा अशा पद्धतीचे घट्ट मिश्रण तयार झाले की त्यात दूधाइतका पातळपणा येईपर्यंत पुन्हा पाणी टाकतात. त्यानंतर या मिश्रणात युरिया किंवा सोडियम सल्फेट, किंवा ग्लुकोज किंवा माल्टोज किंवा कुठलेही रासायनिक खत टाकतात. मिश्रण करतेवेळी असे पदार्थ गरम पाण्यात विरघळविले जातात आणि नंतर ते दूधासारख्या घट्ट द्रावात टाकले जातात. तेलाचा वापर केल्यामुळे बनावट दूधात फॅटस्‌ तयार होतात. तर इतर पदार्थ हे रंग आणण्याच्या कामी मदत करतात. अशा पदार्थांना सॉलीड नॉट फॅट किंवा एसएनएफ असे म्हणतात. खऱ्या दूधामध्ये अशा सॉलीड नॉट फॅटचे जितके प्रमाण असते तेच प्रमाण या बनावट दूधातही राहील याची काळजी घेण्यात येते. त्यानंतर हे बनावट दूध हे खऱ्या दूधाच्या प्रमाणात मिसळले जाते.

त्यामुळे गावपातळीवरील दूधसंस्थांमध्ये जेव्हा या दूधाची लॅक्‍टोमीटरच्या साह्याने चाचणी घेतली जाते तेव्हा त्यावेळी संशयास्पद काहीच आढळत नाही आणि असे बनावट दूध सहजपणे ही चाचणी पार करून जातात.

अशा या बनावट दूधाची नैसर्गिक दूधाशी तुलना केली तर खालील फरक दिसून येतो.
१. रंगचाचणीतनैसर्गिक दूधाचा रंग पांढरा असतो तसाच बनावट दूधही पांढऱ्या रंगाचे दिसून येते
२. काही काळ साठवणूक केल्यावरही नैसर्गिक दूधाचा रंग बदलत नाही मात्र बनावट दूध फिकट पिवळ्या रंगात बदलते.
३. नैसर्गिक दूध तळहातावर चोळल्यानंतर त्याचा फेस होत नाही. मात्र बनावट दूध तळहातावर चोळल्यानंतर त्याचा फेस होतो.
४. नैसर्गिक दूधाची सामू (पी. एच. ) चाचणी केली असता तो ६.६ ते ६.८ इतका असतो. तर बनावट दूध कमालीचे अल्कलीयुक्त (अल्कलाईन) असल्याचे सामूचाचणीत दिसून येते. त्याचा सामू १० ते ११ इतका जास्त असू शकतो.
५. फॅट मात्र नैसर्गिक दूधाइतकेच बनावट दूधातही आढळून येते. नैसर्गिक दूधात फॅटचे प्रमाण ४.५ ते ५.० टक्के इतके असू शकते.
६. सॉलीड नॉट फॅट किंवा एसएनएफचे प्रमाण नैसर्गिक दूधात ८ ते ९ टक्के इतके असते तितकेच प्रमाण बनावट दूधातही राखण्याचे भान भेसळबहाद्दर पाळताना दिसतात.
७. नैसर्गिक दूध तापविले असता त्याच्या रंगात बदल होत नाही. याउलट बनावट दूध तापविल्यानंतर त्याचा रंग पिवळसर होतो.
८. नैसर्गिक दूधाची युरिया चाचणी घेतली असता त्यात फिकट पिवळा रंग आढळून येतो. तर बनावट दूध युरिया चाचणीदरम्यान गडद पिवळ्या रंगाचे होते.
यातील काही चाचण्या आपण घरीही करून बनावट दूध ओळखू शकतो.

जास्तीत जास्त पैसे कमावण्याची हावपोटी अशा प्रकारच्या बनावट दूधनिर्मितीचा आधार घेतला जातो. भारतात उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा राज्यातील काही भाग बनावट दूधनिर्मितीसाठी कुप्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे या दूधाच्या निर्मितीसाठी केवळ तीन ते चार रुपये प्रतिलिटर खर्च येतो आणि त्याची विक्री मात्र नेहमीच्या बाजारभावाने म्हणजेच २० ते २५ रुपये लिटरप्रमाणे केली जाते. यावरून बनावट दूधाचे अर्थशास्त्रही लक्षात यावे.
-http://beta.esakal.com/Blog

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा