मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

शनिवार, ९ मे, २००९

आपले योग्य वजन कसे ठरवाल?


आपले वजन किती असावे याची माहिती अनेकांना नसते. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) किंवा याचप्रकारचे मापदंड खरंच कितपत योग्य आहेत? कंबर व नितंबाचा घेर यांच्या प्रमाणावरून आपल्याला योग्य वचन समजू शकते का?

वैद्यकशास्त्रानुसार जास्तीची चरबी शरीराला अपायकारक ठरते. पण दररोजच्या आहारात 'फॅट'चे प्रमाण अजिबात नसणे हे ही 'नर्व्ह सेल्स' चे मंदत्व आणि हार्मोन्सची निर्मिती थांबवते. त्याबरोबरच स्निग्ध पदार्थात विरघळणारे काही व्हिटॅमिन्स शरीरात न विरघळता तसेच शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे दररोजच्या आहारात किती कॅलरीज असाव्यात व त्यामुळे आपले आदर्श वजन कायम राहील? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे. स्वतः:चे योग्य वजन ठरवण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. ज्यात उंची व वजनाच्या गुणोत्तराने योग्य वजन काढता येते. काही पद्धतीत शरीराच्या चरबीच्या स्तराला योग्य मोजता येऊ शकते. या परिस्थितीत आले योग्य वजन 'मसल मांस' किती आहे यावर ठरते.

योग्य वजन म्हणजे काय?
वजनबरोबर असणे याचा अर्थ शरीर ठीक आहे, असा नाही. जवळजवळ सर्वांच्या शरीराचा फिटनेस बदलत असतो. त्यामुळे योग्य वजनाच्या व्याख्येत तुमचे वय, लिंग व उंची या आधारावर तुमचे वजन ठरवले जाते. डॉक्टर वेगळ्या आधारावर तुमच्या जाडेपणाचा निष्कर्ष ठरवतात.

कोणत्याही वयासाठी बीएमआय 18.5 ते 25च्या दरम्यान असल्यास योग्य समजले जाते. जर 30 च्या वर असेल तर वजन जास्त आहे, असे ठरवले जाते. आणि त्याहीपेक्षा जास्त वजन असल्यास त्यास अतिलठ्ठ या सदरात तुम्ही गणले जातात.

वजन कमी करण्यासाठी बीएमआय कायम योग्य असेलच असे नाही। कारण बॉडी बिल्डरांच्या मांसपेशींचे वजन चरबीपेक्षा जास्त असते। त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांचा बीएमआय नेहमी जास्त येत असतो। याचप्रमाणे वयस्करांसाठी 25 ते 27 च्या दरम्यान बीएमआय असणे योग्य आहे. कारण जर तुमचे वय 65 च्यावर आहे. तर हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण मिळेल ते या शरीरावरील अतिरिक्त चरबीमुळेच.


महिलांसाठी योग्य वजन-
आदर्श वजन पुरूष व स्त्री यांत वेगवेगळे असते. तसेच आशियाई व कॉकशियन वंशाच्या स्त्रियांतही फरक आठळतो. पाच फूट उंची असणार्‍या स्त्रीसाठी 45.5 किलोग्रॅम हे आदर्श वजन आहे. जर उंची पाच फुटापेक्षा कमी आहे तर प्रत्येक इंज उंचीवर 2.7 किलोग्रॅम वजन कमी असे मोजावे. आता तुमच्या शरीराची ठेवण छोटी, मध्यम व मोठी आहे का? हे ठरवण्याची सोपी पद्धत म्हणजे तुमच्या मनगटाचे माप जर सहा इंच असेल तर तुमच्या आदर्श वजनात 10 टक्के घट करावी. जर ते माप सहा इंचापेक्षा जास्त असेल तर आदर्श वजनात 10 टक्क्यांनी वाढ करावी.

पुरुषांसाठी योग्य वजन-
पाच फूट उंचीच्या पुरषांचे योग्य वजन 48.2 किग्रॅ असावे. जर मनगटाचे माप सात इंच असेल तर मध्यम ठेवण आहे. जर कमी असेल तर तुमची चण लहान आहे तर योग्य वजनाच्या 10 टक्के वजन कमी समजावे. ते माप सात इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्ही मोठ्या चणीचे आहात व तुमच्या योग्य वजनात 10 टक्के वजन वाढ करावी.

यातही शरीरसौष्ठवपटूंच्या आदर्श वजनात फरक पडू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे वजन कमी करण्याची आवश्यकता सर्वांनाच नसते. तेव्हा शेजारी, मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्या सल्ल्याने वजन कमी करण्याचे उपाय न ऐकता संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्रोत - वेब दुनिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा