शुक्रवार, २५ सप्टेंबर, २००९
मंगळवार, २२ सप्टेंबर, २००९
औषधी मध
दृष्टीदोष
डोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणी गळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी डोळ्यात नुसता मध घालवा अगर सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा. यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे होतात. दृष्टी फार लवकर सुधारते.
त्वचारोग
सारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा उत्पन्न होतो. त्वचेची आग होते. अशा वेळी मध रोज घेणे हितकारक आहे. रोज वयोमानाप्रमाणे १ ते २ तोळे मध व पाणी एकत्र करुन घ्यावे. अंगकाठी सतेज होते.
श्वास खोकला
श्वासामुळे सारखा लागणारा दम, कफामुळे सारखा येणारा खोकला, खोकुन खोकुन पोटात दुखु लागते. कंबर वाकते. एक प्रकारची तोंडावर सूज येते. सारखा कफ पडतो. अशावेळी मध अगर त्रिफळा पूर्ण व मध एकत्र करुन घावे.
अतिसार
काही खाल्ले तरी वांती होणे. अशी सवय अनेकांना असते. म्हणून अन्न पचत नाही. त्यामुळे भुक चांगली नसते. वांति होईल या भितीने अन्नद्वेष. त्यामुळे निरूत्साह उत्पन्न होती. यावेळी मधाचा वापर अन्नात अवश्य करावा. त्यामुळे वांती होण्याची प्रवृत्ती कमी होते.
कृमी
लहान बालके, मोठी माणसे कोणासही कृमी होण्याची प्रवृत्ती असते. त्यांच्या शरीरात कृमींमुळे अन्नद्वेष उत्पन्न झालेला असतो. यावेळी मध घेत जावा.
गॅस होणाऱ्यास मध व लिंबू रोज द्या
ज्या व्यक्तिंना गॅसेस होतात. अशी तक्रार असते. भूक लागत नाही, उत्साह नसतो. काम करण्याची इच्छा नसते. कोणत्याही कामास कंटाळा येतो. नेहमी निरुत्साही वाटे. अशांनी रोज लिंबू रस (एक लिंबाचा) व मध एकत्र करून ते मिश्रण रोज सकाळी काही खाण्यापूर्वी घेत जावे.
कफ विकार
खोकल्याचा, दम्याचा त्रास ज्या व्यक्तीना होत असतो, त्यांनी मधाचा वापर आपल्या आहारात सतत करावा. त्यामुळे कफाचा जोर कमी होतो व अंगात उत्साह येतो.
मध हा काही आजार असला, आपणास कोणत्यातरी गोष्टीपासून उपद्रव होत असला तरच घ्यावा, असे नाही.
चांगल्या व्यक्तींनी सुध्दा मधाचा वापर करावा. कारण मध हा आयुष्यवर्धक व वीर्यवर्धक आहे. त्यामुळे आरोग्यसंपन्न होण्यासठी तो शरीरास उपयोगी आहे.
पोटाच्या विकारांवर मध
रोज सकाळी एक पेलाभर थंड पाणी व चहाचे दोन चमचे मध एकत्र घेऊन चांगले एकजीव करुन घेणे। त्यामुळे पोटाचे विकार बरे होतात . डोकेदुखी, हातापायास ठ्णका, संधिवात यावर मध चांगले औषध आहे. भूकपण चांगली लागते. (लहान मुलास एक चमचा मध देणे.)
- http://www.marathimati.com/
शनिवार, १९ सप्टेंबर, २००९
आयुर्वेदिक औषधे
गुरुवार, १३ ऑगस्ट, २००९
बनावट दूध नेमके काय असते?
खेड्यांमध्येच या बनावट दूधाचे साठे सापडण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच गावांमध्ये सहकारी दूध उत्पादक संघांच्या माध्यमातून दूध संकलनाचे काम चालते. दूध संकलन करताना लॅक्टोमीटरच्या साह्याने दूधातील फॅट तपासले जाते. त्यानुसारच या दूधाचा दर्जा ठरविला जातो आणि ते विकत घेतले जाते.
मात्र ही तपासणी केवळ फॅट तपासण्यापुरतीच मर्यादित राहते. याव्यतिरिक्त इतर चाचण्या अशा दूध केंद्रांवर सहसा केल्या जात नाहीत. त्याचाच फायदा हे बनावट दूधमाफिया घेतात. त्यांचे हे बनावट दूध या फॅट चाचणीला पूरेपूर उतरते आणि कुणाच्याही नकळत चांगल्या दूधात मिसळले जाते. त्यातूनच मग सर्वसामान्य ग्राहकांच्या जीवाशी एक जीवघेणा खेळ सुरू होतो. हे बनावट दूध नक्की कसे तयार होते. त्याच्या चाचण्या कशा कराव्यात हे समजले तर आपणही नक्कीच त्याच्या दुष्परिणामापासून वाचू शकतो.
सिंथेटिक किंवा बनावट दूध हे गाई किंवा म्हशीच्या नैसर्गिक दूधासारखेच दिसत असले तरी ते काही खरे दूध नव्हे. नेहमीच्या दूधाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात इतर कृत्रिम पदार्थांची भेसळ केली जाते. अशा कृत्रिम पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या दुधालाच सिंथेटिक किंवा रासायनिक दूध असेही म्हणतात. यात मुख्यत: पाणी, अतिशय बारीक केलेली डिटर्जंट पावडर किंवा साबण, सोडियम हायड्रॉक्साइड, खाद्यतेल, मीठ आणि युरिया यांच्या मिश्रणाचा बनावट दूधात उपयोग केला जातो.
अशा पद्धतीचे दूध तयार करण्यासाठी एका मोठ्या तोंडाच्या भांड्यामध्ये कुठल्याही प्रकारचे खाद्यतेल घेतले जाते. ते पाण्यात अशा पद्धतीने मिसळतात की त्यापासून दूधासारखे घट्ट पांढरे मिश्रण तयार होईल. तेल आणि पाणी यांचे मिश्रण होण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या रसायनाचा वापर केला जातो. एकदा अशा पद्धतीचे घट्ट मिश्रण तयार झाले की त्यात दूधाइतका पातळपणा येईपर्यंत पुन्हा पाणी टाकतात. त्यानंतर या मिश्रणात युरिया किंवा सोडियम सल्फेट, किंवा ग्लुकोज किंवा माल्टोज किंवा कुठलेही रासायनिक खत टाकतात. मिश्रण करतेवेळी असे पदार्थ गरम पाण्यात विरघळविले जातात आणि नंतर ते दूधासारख्या घट्ट द्रावात टाकले जातात. तेलाचा वापर केल्यामुळे बनावट दूधात फॅटस् तयार होतात. तर इतर पदार्थ हे रंग आणण्याच्या कामी मदत करतात. अशा पदार्थांना सॉलीड नॉट फॅट किंवा एसएनएफ असे म्हणतात. खऱ्या दूधामध्ये अशा सॉलीड नॉट फॅटचे जितके प्रमाण असते तेच प्रमाण या बनावट दूधातही राहील याची काळजी घेण्यात येते. त्यानंतर हे बनावट दूध हे खऱ्या दूधाच्या प्रमाणात मिसळले जाते.
त्यामुळे गावपातळीवरील दूधसंस्थांमध्ये जेव्हा या दूधाची लॅक्टोमीटरच्या साह्याने चाचणी घेतली जाते तेव्हा त्यावेळी संशयास्पद काहीच आढळत नाही आणि असे बनावट दूध सहजपणे ही चाचणी पार करून जातात.
अशा या बनावट दूधाची नैसर्गिक दूधाशी तुलना केली तर खालील फरक दिसून येतो.
१. रंगचाचणीतनैसर्गिक दूधाचा रंग पांढरा असतो तसाच बनावट दूधही पांढऱ्या रंगाचे दिसून येते
२. काही काळ साठवणूक केल्यावरही नैसर्गिक दूधाचा रंग बदलत नाही मात्र बनावट दूध फिकट पिवळ्या रंगात बदलते.
३. नैसर्गिक दूध तळहातावर चोळल्यानंतर त्याचा फेस होत नाही. मात्र बनावट दूध तळहातावर चोळल्यानंतर त्याचा फेस होतो.
४. नैसर्गिक दूधाची सामू (पी. एच. ) चाचणी केली असता तो ६.६ ते ६.८ इतका असतो. तर बनावट दूध कमालीचे अल्कलीयुक्त (अल्कलाईन) असल्याचे सामूचाचणीत दिसून येते. त्याचा सामू १० ते ११ इतका जास्त असू शकतो.
५. फॅट मात्र नैसर्गिक दूधाइतकेच बनावट दूधातही आढळून येते. नैसर्गिक दूधात फॅटचे प्रमाण ४.५ ते ५.० टक्के इतके असू शकते.
६. सॉलीड नॉट फॅट किंवा एसएनएफचे प्रमाण नैसर्गिक दूधात ८ ते ९ टक्के इतके असते तितकेच प्रमाण बनावट दूधातही राखण्याचे भान भेसळबहाद्दर पाळताना दिसतात.
७. नैसर्गिक दूध तापविले असता त्याच्या रंगात बदल होत नाही. याउलट बनावट दूध तापविल्यानंतर त्याचा रंग पिवळसर होतो.
८. नैसर्गिक दूधाची युरिया चाचणी घेतली असता त्यात फिकट पिवळा रंग आढळून येतो. तर बनावट दूध युरिया चाचणीदरम्यान गडद पिवळ्या रंगाचे होते.
यातील काही चाचण्या आपण घरीही करून बनावट दूध ओळखू शकतो.
जास्तीत जास्त पैसे कमावण्याची हावपोटी अशा प्रकारच्या बनावट दूधनिर्मितीचा आधार घेतला जातो. भारतात उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा राज्यातील काही भाग बनावट दूधनिर्मितीसाठी कुप्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे या दूधाच्या निर्मितीसाठी केवळ तीन ते चार रुपये प्रतिलिटर खर्च येतो आणि त्याची विक्री मात्र नेहमीच्या बाजारभावाने म्हणजेच २० ते २५ रुपये लिटरप्रमाणे केली जाते. यावरून बनावट दूधाचे अर्थशास्त्रही लक्षात यावे.
-http://beta.esakal.com/Blog
बुधवार, १२ ऑगस्ट, २००९
Baba Ramdev Swine Flu Video
मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९
टॅमिफ्लूचे अनावश्यक सेवन टाळा!
स्वाइन फ्लूची साथ आटोक्यात आणण्यासाठी सरसकट टॅमिफ्लू या प्रतिजैविकाचा वापर करण्याचा सल्ला सर्वच यंत्रणांकडून देण्यात येत आहे. मात्र, जपानी संशोधकांच्या मते लहान मुलांना टॅमिफ्लू देणे अत्यंत हानीकारक असून, भविष्यात या औषधाचे दुष्परिणाम म्हणून मुलांमध्ये मानसिक समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
जपानी संशोधकांनी केलेल्या संशोधनातही ही बाब उघड झाली असून, टॅमिफ्लूचे सेवन केलेल्या अनुक्रमे १२ आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलांनी उडी मारल्यानंतर त्यांचे पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सिद्ध झाले आहे. ही झाली सन २००६-०७ ची गोष्ट. ही माहिती न्यूसायंटिस्ट डॉट कॉम या वेबसाईटवर आहे. त्यानंतर, बसेलस्थित (स्वित्झर्लंड) रोश होल्डिंग या टॅमिफ्लूची निर्मिती करणाऱ्या जगातील एकमेव कंपनीकडून करण्यात आलेल्या खुलाश्यात या औषधाचे सेवन करणाऱ्यांमध्ये मानसिक आजारांची लक्षणे कमी प्रमाणात आढळल्याचा दावा करण्यात आला. फ्लू हा मुळातच मेंदू आणि मानसिक आजारांशी संबंधित विकार आहे. त्यामूळे या रोगाचे विषाणू थेट मेंदूवरच आघात करतात. मात्र टॅमिफ्लूच्या वापराने त्या विषाणूंची संख्या नियंत्रित करणे अथवा नष्ट करणे सहज शक्य असल्याचे मत रोशच्या टॅमिफ्लू निर्मिती विभागाचे तत्कालीन प्रमुख डेव्हिड रेड्डी यांनी व्यक्त केले होते. मात्र, २००७ मधील जपान सरकारच्या आकडेवारीनुसार टॅमिफ्लूच्या सेवनाने ५४ लोकांना जीव गमवावा लागला होता, असेही या वेबसाईटवर म्हटले आहे.
जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजेसचे प्रमुख संशोधक मासातो ताशिरो यांच्या मते टॅमिफ्लूच्या सेवनाने मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, तैवान आणि काही युरोपीय देशांमध्ये टॅमिफ्लूच्या वापरावर स्पष्ट निर्बंध घालण्यात आले आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये टॅमिफ्लू आणि रेलेंझा या प्रतिजैविकांमुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखता येतो, मात्र, त्याचे दुष्परिणामही थांबवता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाला असेल तरच, टॅमिफ्लूचे सेवन करणे आवश्यक आहे. अनावश्यक भीतीपोटी किंवा कोणाच्याही दबावात न येता वैद्यकीय सल्ल्यानेच या प्रतिजैवकाची योग्य मात्रा घेणे आवश्यक ठरणार आहे. ई सकाळच्या एका जागरुक वाचकाने पाठविलेल्या इंग्लंडमधील डेली मेल दैनिकातील बातमीनुसार, तेथील वैद्यकीय तज्ञांनी लहान मुलांकरीता टॅमिफ्लूचे सेवन घातक असल्याने ते टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते टॅमिफ्लू या प्रतिजैविकामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव अत्यंत अल्प प्रमाणात रोखता येतो, हे जरी खरे असले तरी त्यामुळे मुलांच्या शरीरात अत्यंत जटील समस्या निर्माण होतात हेदेखील विदारक सत्य आहे. टॅमिफ्लूच्या सेवनाचा लहान मुलांच्या शरीरावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी प्रदीर्घ संशोधन करण्यात आले आहे. त्यातून वरील निष्कर्ष काढण्यात आले आहेत. याचा अर्थ मुळीच असा नाही की लहान मुलांना स्वाइन फ्लू झाला असता टॅमिफ्लू देउ नये, या लेखाचे तात्पर्य एवढेच की केवळ संशयपिशाच्चामुळे सरसकट ही गोळी न देता ती डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावी. इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या निरीक्षणांमध्ये टॅमिफ्लूच्या अतिरेकी सेवनामुळे लहान मुलांमध्ये सतत उलटी येणे, अस्वस्थ वाटणे आणि स्वप्नदोष या विकारांची लक्षणे दिसून आली आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीटातील अभ्यासक डॉ. मॅथ्यू थॉम्प्सन आणि डॉ. कार्ल हेनेगन यांच्या मते टॅमिफ्लू हे प्रतिजैविक म्हणजे स्वाइन फ्लूवरील वरदान आहे, असे मुळीच नाही. त्यांनी केलेल्या चार संशोधनांत स्वाइन फ्लू झालेल्या मुलांनी सतत घेतलेली विश्रांती आणि योग्य औषधोपचारामुळे ते इतरांच्या तुलनेत लवकर आजारमुक्त झाले.
http://beta.esakal.com