मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)

मूळव्याध रामबाण औषध (Piles / Mulvyadh / Bavasir)
मूळव्याधीचे प्रकार

गुरुवार, १६ जुलै, २००९

केसांची निगा

१) आवळा, शिकेकाई, रिठा हे सर्व २०० ग्रॅम घेउन एकत्र पाण्यात उकळावे. थोडा कापुर मिसळावा आणि शाम्पुसारखे हे पाणी डोके धुण्यास वापरावे.
२) उरलेली चहापावडर एका ग्लासमध्ये स्वछ पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी पाणी गाळून त्यात लिंबु पिळवा हे पाणी शाम्पुसारखे वापरावे.
३) कडुनिबांची पाने पाण्यात उकळुन त्याने केस धुवावेत. त्यामुळे केस मजबुत तर होतातच शिवाय केस ही गळ्तही नाहीत.
४) जास्वंद जेलने केस गळ्त असल्यास मसाज व कोरफ़ड जेलने केसांना मसाज करावा .
५) शिकेकाई पाण्यात उकळुन हे पाणी शाम्पुसारखे वापरावे त्यामुळे केस चमकदार होतील.
६) मेहंदी पावडर एक पाकीट १०० ग्रॅम घेउन त्यात १चमचा चहापावडरचे पाणी उकळुन त्या मिश्रणात १ चमचा कॉफ़ी पावडरचे पाणी उकळुन त्यात १ चमचा काथा पावडर त्यात घालावी. ही मेहंदी केसांना २ तास ठेवावी. केस सोनेरी रंगाचे तर होतीलच. शिवाय मुलायम पण होतील .

गुरुवार, २ जुलै, २००९

घरचा वैद्य

आवळाने आम्लपित्त थांबते

आम्लपित्तावर आवळा फार गुणकारक आहे. आवळ्याच्या रसात जिरे आणि खडीसाखर घालून सकाळसंध्याकाळ दिवसातून दोन वेळा घ्यावा. आठपंधरा दिवसांत आम्लपित्त थांबते. ताजा आवळा नसताना पूडसुद्धा चालते.

अंगावर पित्त उठत असेल तर...

अंगावर पित्त उठते त्यावेळी कुटलेला ओवा आणि गूळ एकत्र करून तो आल्याच्या रसातून घेतल्यास हा विकार बरा होतो.

सर्दीने आवाज बसला असेल तर...

सर्दीने आवाज बसला किंवा गायनाने घसा दुखत असला तर आल्याचा तुकडा, लवंग आणि मिठाचा खडा एकत्र करून चावावे.

स्मरणशक्ति वाढवण्यासाठी...

स्मरणशक्ति आणि बुद्धि वाढविण्यासाठी आवळा हे उत्तम औषध आहे. आवळे खाल्ल्याने दृष्टि सुधारते आणि कांती सतेज बनते.

दातांच्या सुरक्षेसाठी काही उपाय

* दात दुखत असल्यास दात व हिरड्यांवर लवंगचे तेल लावावे.
* हळदीने दात साफ केल्याने दाताचे आजार होत नाही.
* शेंद मीठ (बारीक केलेल), सारसोच्या तेलात मिसळून हरड्यांवर लावावे. त्याने दात दुखी बंद होते.
* मसुरीच्या डाळीचे पीठ करून त्याने दात साफ केल्याने दातांचे रोग होत नाही.
* मोहरी व शेंद मीठ बारीक वाटून तयार झालेल्या पेस्टने दात घासल्यास दातांचा पिवळेपणा दूर होऊन दातांना चमक येते.
* पपईच्या झाडाच्या दूधात कापसाचा बोळा दाढीखाली ठेवल्यास दाढी दुखी दुर होते.
* काळेमीरे व शेंद मीठ समान भागात घेऊन त्याचे बारीक चूर्ण करावे व त्याला सरसोच्या तेलात मिसळून दातांवर चोळावे, याने दातांचे दुखणे नाहीशे होतात.
* दररोज सकाळी ताज्या ताकाची चुळ भरण्याने दंतरोग बरा होतो.
* काथ व चूना न लावता विड्याचे पान चावावे, त्याने दात दुखी कमी होऊन तोंडाची दुर्गंधी येत नाही.
* सकाळी व रात्रीच्या जेवनानंतर ब्रश करावा.

टक्कल पडणे

1. 2-3 लसण्याच्या पाकळ्या डोळ्याला लावायच्या सुरम्या बरोबर खरळीत वाटाव्या. या चटणीला टक्कल पडलेल्या भागावर लावावे. जळजळ झाली तर अगोदर तूप किंवा लोणी लावून मग त्यावर हा लेप लावावा. 20-30 दिवस हा लेप दररोज करावा.

2. दिवसातून 2-3 वेळा कोथिंबिरीच्या रसाचा मसाज केल्याने काही दिवसातच फायदा होतो.

चेहऱ्यावर डाग, सुरकुत्या

1. चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या मुळे डाग पडल्यास बटाटे उकडून थंड करावे आणि सालासकट वाटून घ्यावेत. त्या काकडीचा रस टाकून थोडा सा लिंबाचा रस मिसळावा या मिश्रणाने चेहऱ्यावर लेप करावा. तासा भराने धुऊन टाकावा काही दिवस प्रयोग केल्याने डाग नाहीसे होतील.

2. चेहऱ्यावर ची काळसर झाक दूर करण्यासाठी एक चमचा व्हिनीगर मध्ये अंड्याचा पांढरा बलक आणि पिकलेले केळे चांगल्याप्रकारे मिसळावे या पेस्टला चेहऱ्यावर 15 मिनिटं लावून ठेवावे नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावे. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करावा.

3. पिकलेले पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर रगडावा. दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा. थोड्याच दिवसात चेहरा उजळून चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या इत्यादी नाहीश्या होतील.

पोटातल्या उष्णतेवर धने उपयुक्त

*फार तहान लागते किंवा पोटात उष्णता वाढते अशावेळी धने रात्री पाण्यात भिजत घालावेत. सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात साखर टाकावी आणि दिवसातून ३- ४ वेळा घ्यावे.

*क्षयरोगातल्या खोकल्यावर ज्येष्ठमधाचा फार उपयोग होतो. ज्येष्ठमधाचे वस्त्रगाळ चूर्ण त्यात निम्मे सितोपलादी चूर्ण मिसळून तूप आणि मधातून वारंवार चाटण केल्यास खोकला सुटून छाती हलकी होते.

*अति घामाने शरीर थंड पडत असेल तर सुके खोबरे, लसूण आणि ओवा ही एकत्र वाटून त्याच्या गोळ्या करून खाव्यात. घाम यायाचा थांबतो आणि शरीर थंड पडत नाही.

*तुळशीच्या पानांचा अंगरस आणि मध ही एकत्र करून प्रत्येक वेळी दोन चमचे प्रमाणे दिवसातून तीन वेळा काही दिवस नियमित घेतल्यास शरीरातील फाजील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

*आवाज बसला तर हळदपूड आणि गूळ एकत्र करून त्याच्या लहान गोळ्या तयार कराव्यात आणि सकाळ-संध्याकाळ त्या गरम दुधाबरोबर घ्याव्यात.

पित्ताने डोके दुखत असल्यास

5 काळ्या मनुका रात्री अर्धा कप पाण्यात भिजत घालाव्या. सकाळी अनशापोटी ते पाणी प्यावे आणि भिजेलेल्या मनुका खाव्यात. डोंगरी आवळा ठेचून त्याचा रस कपाळराला लावावा. अर्धी वाटी गरम दुधात 1 चमचा साखर, कामदुधा पाव चिंचोक्याएवढी घालावी. सकाळी व रात्री प्यावी. मोरावळा चमचाभर घेऊन त्यात कामदमुधा घालून त्यात सूतशेखर मात्रा मूगाच्या डाळी एवढी उगाळून सकाळी प्यावी.

दालचिनी

थंड आहे, तोंड आल्यावर दालचि‍नीचा तुकडा तोंडात खडीसाखरेबरोबर धरतात. दालचिनीची पूड केळ्याबरोबर खाल्ल्यास अंगातली उष्णता कमी होते. चहाच्या मसाल्यात घालतात. पदार्थ रुचकर बनतो.

सादे सोपे घरगुती उपाय

टोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवानं दिसतो. मुरूम, सुरकुत्या, काळे डाग दूर होण्यास मदत मिळते.

उन्हाळ्यात जर घाम जास्त येत असेल तर पाण्यात तुरटी घालून अंघोळ केली पाहिजे.

रात्री झोप नसेल लागत तर झोपताना पायांना सरसोच्या तेलाची मालीश करून झोपायला पाहिजे, लगेचच झोप येते.

एक कप गुलाब पाण्यात अर्ध लिंबाचे रस टाकून त्याचे सकाळ-संध्याकाळ चूळ भरल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होऊन हिरड्या व दात मजबूत होतात.

जेवणात दर रोज 2 केळी घेतली तर भुकेत वाढ होते.

आवळा भाजून खाल्ल्याने खोकलात लेगच आराम पडतो.

1 चमचा साजुक तुपात हिंग घालून प्यायलाने पोटदुखीत आराम मिळतो.

लिंबू पित्तनाशक आहे

लिंबाचे लोणचे पाचक आहे. सरबत पित्तनाशक आहे. अर्ध्या फोडीवर साखर, अर्ध्या फोडीवर मीठ घालून निखार्‍यावर ठेवून गरम करावे. दोन्ही फोडी पिळून त्याचा रस चाटावा. डोकेदुखी, पित्त नाहीसे होते. पचनास चांगले म्हणून जेवणात दररोज घ्यावे.

गाजर एक औषधी..

* कच्चे गाजर खाणे नेहमी फायदेशीर असते. गाजरामध्ये असलेल्या पिवळा भाग खाऊ नये, कारण ते अधिक उष्ण असल्याने ऍसिडिटीचा त्रास उद्भव असतो.

* गाजर हृदयरोगावर अधिक लाभदायी असून रक्त शुद्ध करणे, वातदोषनाशक, पुष्टिवर्द्धक तसेच मेंदू व आतडे यांच्या दृष्टीने बलवर्धक आहे. मूळव्याध, पोटाचे विकार, मूतखडा आदी आजारांवर औषधी आहे.
* गाजर गर्भवती महिलांसाठी गरम पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी गाजर सेवन करू नये.

* गाजरामध्ये कॅल्शियम व केरोटीन हे मुबलक प्रमाणात असल्याने लहान मुलांसाठी उत्तम आहार आहे. मुलांच्या पोटातील जंत नष्ट करण्यासाठी गाजर औषधी आहे.
* गाजरामध्ये विटामीन 'ए' मुबलक प्रमाणात असल्याने नेत्र रोगावर लाभदायक आहे.
* दररोज गाजरचा रस प्यायल्याने दृष्टी प्रखर होत असते.

-webduniya